सार्वभौम सुवर्ण रोख्यांची झळाळी वाढली!

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 जुलै 2017

नवी दिल्ली - सार्वभौम सुवर्ण रोख्यांची (सॉव्हरिन गोल्ड बाँड) लोकप्रियता वाढविण्याच्या हेतूने केंद्र सरकारने आज या रोख्यांमधील गुंतवणुकीची मर्यादा वार्षिक ५०० ग्रॅमवरून तब्बल ४ किलोंपर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतला. या रोख्यांसंदर्भातील इतर काही अटीदेखील शिथिल करण्यात आल्या आहेत.

भौतिक स्वरूपातील सोन्याला पर्यायी गुंतवणूक म्हणून केंद्र सरकारने सार्वभौम सुवर्ण रोख्यांची योजना दोन वर्षांपूर्वी आणली.सध्याच्या नियमानुसार, या सुवर्ण रोख्यांत एका वर्षात एका व्यक्तीला जास्तीत जास्त ५०० ग्रॅमपर्यंतच गुंतवणूक करता येत होती. आता दर आर्थिक वर्षांसाठी व्यक्तींना ४ किलो, हिंदू अविभक्त कुटुंबाला (एचयूएफ) ४ किलो, तर सरकारने मान्यता दिलेल्या ट्रस्ट व त्यासारख्या संस्थांना २० किलोंपर्यंतची गुंतवणूक करता येणार आहे. ही मर्यादा आर्थिक वर्षानुसार मोजली जाणार असून, त्यात दुय्यम बाजारातून (सेकंडरी मार्केट) खरेदी केलेल्या सुवर्ण रोख्यांचाही समावेश असेल, असे सरकारी निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मात्र, बॅंका व वित्तीय संस्थांकडील तारणाचा या गुंतवणूकमर्यादेत समावेश असणार नाही.

विविध व्याजदरांचे सुवर्ण रोखे 
वेगवेगळ्या स्तरांतील गुंतवणूकदारांना पर्याय देण्यासाठी आगामी काळात वेगवेगळ्या व्याजदरांचे सार्वभौम सुवर्ण रोखे सादर करण्याची मुभा अर्थ मंत्रालयाला देण्यात आली आहे. स्पर्धात्मकता, बाजारातील अस्थिरता आणि सोन्यातील चढ-उतार यासारख्या घटकांना डोळ्यांसमोर ठेवून अशी मुभा किंवा लवचिकता दिली जाणार आहे.

Web Title: arthavishwa news