आयडिया सेल्युलरला ८१५ कोटींचा तोटा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

नवी दिल्ली - दूरसंचार क्षेत्रातील प्रमुख कंपनी असलेल्या आयडिया सेल्युलरला जूनअखेर संपलेल्या तिमाहीत रु. ८१५ कोटींचा तोटा झाला आहे. त्याआधीच्या तिमाहीत म्हणजेच गेल्या वर्षीच्या चौथ्या तिमाहीत रु. ३२७.७ कोटींचा तोटा झाला होता.

कंपनीच्या उत्पन्नात किरकोळ वाढ नोंदविण्यात आली आहे. आयडिया सेल्युलरने सरलेल्या तिमाहीत रु. ८१८१.७ कोटींचे उत्पन्न नोंदविले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत रु. ८१२६.१ कोटींचे उत्पन्न मिळाले होते.  

मुकेश अंबानींच्या ‘रिलायन्स जिओ’च्या आकर्षक योजनांमुळे आयडिया सेल्युलरला सलग तिसऱ्या तिमाहीत नुकसान सोसावे लागले आहे. ‘जिओ’ सातत्याने नवनवीन ऑफर सादर करीत असल्याने सध्या बहुतांश गुंतवणूक ही केवळ ग्राहकवर्ग टिकवून ठेवण्यासाठी वळविण्यात आल्याचे कंपनीतील अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबई शेअर बाजारात आयडिया सेल्युलरचा शेअर २.११ टक्‍क्‍यांच्या घसरणीसह ९२.६५ रुपयांवर बंद झाला. 

Web Title: arthavishwa news 815 crore profit idea cellular