बाजारात गुंतवणुकीसाठी ‘आधार’ बंधनकारक

वृत्तसंस्था
सोमवार, 21 ऑगस्ट 2017

मुंबई - शेअर आणि म्युच्युअल फंडांतील गुंतवणुकीसाठी ‘आधार’ क्रमांक बंधनकारक करण्याचा निर्णय भांडवली बाजार नियंत्रक सेबीने घेतला आहे. मुंबई शेअर बाजार (बीएसई) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (एनएसई) दोन्ही एक्‍स्चेंजेसना सेबीने सूचना केल्या आहेत. ३१ डिसेंबरपर्यंत गुंतवणूकदारांना त्यांचे डिमॅट आणि म्युच्युअल फंड खाते आधार क्रमांकाशी संलग्न करावे लागणार आहे. 

काळ्या पैशातील व्यवहारांचा छडा लावण्यासाठी केंद्राच्या सूचनेनुसार सेबीने पावले उचलली आहेत. नुकताच ‘सेबी’कडून आधार बंधनकारक करण्यासंदर्भातील अध्यादेश जाहीर करण्यात आला. या प्रस्तावावर ‘बीएसई’ने सर्व शेअर दलालांना २३ ऑगस्टपर्यंत म्हणने मांडण्याची मुदत दिली आहे. शेअर दलालांनी गुंतवणूकदारांचे आधार कार्ड डिमॅटशी संलग्न करावेत; तसेच नव्या गुंतवणूकदारांकडून डिमॅट खाते उघडतानाच आधार क्रमांकाची माहिती घ्यावी, असे बीएसईने म्हटले आहे.

Web Title: arthavishwa news aadhar card number compulsory for market investment