वॉलमार्टचा भारताला फायदाच

पीटीआय
शुक्रवार, 11 मे 2018

नवी दिल्ली - वॉलमार्टने फ्लिपकार्ट ताब्यात घेतल्याने भारताचा फायदाच होणार असून, देशात कोट्यवधी रोजगार निर्माण होतील. याचसोबत अर्थव्यवस्थेलाही हातभार लागेल, असा विश्‍वास वॉलमार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डग मॅकमिलन यांनी गुरुवारी व्यक्त केला. 

जगातील सर्वांत मोठी रिटेलर कंपनी वॉलमार्टने भारतीय ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट ताब्यात घेतल्यानंतर अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. ई-कॉमर्स क्षेत्रातील जगातील सर्वांत मोठ्या या व्यवहाराची घोषणा केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच, अन्य मंत्र्यांची भेट मॅकमिलन यांनी न घेतल्याबद्दल प्रश्‍न उपस्थित होत आहे. याविषयी मॅकमिलन म्हणाले, ‘‘याआधी मी सरकारी प्रतिनिधींची भेट घेतली असून, भविष्यातही त्यांची भेट घेण्यात येईल. प्रत्येक प्रकारच्या सरकारबरोबर आणि प्रत्येक पातळीवर आम्हाला काम करावे लागते.

फ्लिपकार्टमधील ७७ टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या व्यवहारास भारतीय स्पर्धात्मकता आयोगाकडून मंजुरी मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. या  व्यवहारात भारतातील कर नियमांचे पालन केले जाईल. हा व्यवहार ग्राहकांसाठी चांगला असून, रोजगारनिर्मिती होण्यासोबत येथील समाजालाही मदत होणार आहे.’’

स्वदेशी जागरण मंचाचा विरोध 
देशात वॉलमार्ट मागील दाराने प्रवेश मिळवत असल्याचा आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न स्वदेशी जागरण मंचाने केला आहे. पंतप्रधानांनी या प्रकरणी हस्तक्षेप करुन राष्ट्रहित जपावे, अशी मागणी मंचाने केली आहे. 

Web Title: arthavishwa news agitation oppose walmart