‘अविवा’ची बॅंक ऑफ महाराष्ट्रला साथ

कैलास रेडीज
गुरुवार, 11 जानेवारी 2018

नवी दिल्ली - महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोचलेल्या आणि आठ दशके ग्राहकांशी विश्वासाचे नाते असलेल्या बॅंक ऑफ महाराष्ट्रला सोबत घेऊन अविवा लाइफ इन्शुरन्सने विमा क्षेत्रातील प्रस्थापितांसमोर आव्हान उभे केले आहे. बुधवारी (ता. १०) येथे बॅंक ऑफ महाराष्ट्र आणि अविवा लाइफ इन्शुरन्समध्ये कॉर्पोरेट एजन्सी व्यवस्थापनाचा करार करण्यात आला. अविवा आणि बॅंक ऑफ महाराष्ट्रचे मिळून जवळपास दोन हजार शाखांचे नेटवर्क आणि त्या दिमतीला ३४ हजार कर्मचाऱ्यांची फौज विमा व्यवसायासाठी निर्णायक ठरणार आहे.

ब्रिटनमधील तीनशे वर्षांचा व्यवसायिक वारसा असलेल्या अविवा लाइफ इन्शुरन्सने भारतात ‘डाबर इन्व्हेस्ट कॉर्प’समवेत चांगला जम बसवला आहे. १० वर्षांत ‘अविवा’च्या १०० हून अधिक शाखा व १४ हजार विमा सल्लागार कार्यरत आहेत.

१०० कोटींचे उद्दिष्ट
बॅंकिंग बरोबरच आयुर्विमा व्यवसायातून भक्कम महसुलाचे बॅंकेने उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती बॅंक ऑफ महाराष्ट्रचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आर. पी. मराठे यांनी ‘सकाळ’ला दिली. सध्या बॅंकेला विमा विक्रीतून कमिशनपोटी ११ कोटींचा महसूल मिळतो. चालू वर्षात २२ कोटींचे लक्ष्य असून, १४ कोटी पूर्ण झाले आहेत. ‘अविवा’मुळे ग्राहकांना वैविध्यपूर्ण पर्याय उपलब्ध होईल, असे मराठे यांनी सांगितले.

विमा वितरणासाठी बॅंक ऑफ महाराष्ट्र ही ‘अविवा’ची सार्वजनिक क्षेत्रातील पहिली सहयोगी बॅंक ठरली आहे. महाराष्ट्रात आणि भारतात शाखांचे विस्तृत जाळे, तंत्रज्ञानपूरक सेवा आणि वर्षानुवर्षे बॅंकेसोबत असलेल्या ग्राहकांपर्यंत ‘अविवा’ला पोचता येणार आहे. भारतीयांच्या गरजेनुसार भविष्यात नावीन्यपूर्ण उत्पादने विकसित करण्याच्यादृष्टीने ही भागीदारी महत्त्वपूर्ण ठरेल.
- ट्रेव्हर बुल, व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, अविवा लाइफ इन्शुरन्स

Web Title: arthavishwa news avia support to bank of maharashtra