‘ताळेबंद स्पष्ट तरच विलीनीकरण सफल’

पीटीआय
बुधवार, 13 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली - ताळेबंद स्पष्ट असेल तरच सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांच्या विलीनीकरणाचा हेतू सफल होईल, असे मत रिझर्व्ह बॅंकेचे माजी गव्हर्नर रघुरामन राजन यांनी व्यक्त केले. बॅंकांना सक्षम करायला हवे. बॅंकिंग व्यवस्थेमधून राजकारणाला काढून टाकल्यास बॅंकांचे विलीनीकरण आदर्शवत होईल, असेही राजन म्हणाले. 

राजन यांनी एका वृत्तसंस्थेला मुलाखत देताना बॅंकिंग व्यवस्थेतील सद्यःस्थिती व विलीनीकरणावर प्रकशझोत टाकला. बॅंकांच्या विलीनीकरणाचा निर्णय हा बॅंकिंग व्यवस्था समजणाऱ्यांनी अंमलात आणावा, विलीनीकरण बाबूशाहांनी आणल्यास ते अनावश्‍यक असे होईल, असेही राजन म्हणाले. विलीनीकरणाला सामोरे जाणे सोपी गोष्ट नसल्याचे राजन म्हणाले.

एसबीआयच्या विलीनीकरणाबाबत बोलताना राजन म्हणाले, वेगवेगळ्या पद्धतीच्या, भिन्न प्रवृत्तींच्या व्यवस्थांच्या व विभागांच्या बॅंकांचे एकाच बॅंकेत विलीनीकरण करणे तारेवरील कसरत असते. अशा बॅंकांमध्ये वैयक्तिक अडचणीही असतात. उदा. बॅंकेतील बॉस कोण आहे, किंवा सहकारी कोण आहे. अशा लुटापुटीच्या मात्र व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या कामात वेळ व्यर्थ वाया जातो, असे राजन म्हणाले.

Web Title: arthavishwa news Balance sheet successful only if merger successful