बॅंक ऑफ बडोदाला दंड

पीटीआय
गुरुवार, 5 एप्रिल 2018

नवी दिल्ली - करचुकवेगिरी आणि संशयास्पद व्यवहारांची माहिती न दिल्याने बॅंक ऑफ बडोदाला नऊ कोटी रुपयांचा दंड वित्तीय गुप्तचर विभागाने केला आहे. 

नवी दिल्ली - करचुकवेगिरी आणि संशयास्पद व्यवहारांची माहिती न दिल्याने बॅंक ऑफ बडोदाला नऊ कोटी रुपयांचा दंड वित्तीय गुप्तचर विभागाने केला आहे. 

बॅंक ऑफ बडोदाच्या दिल्लीतील शाखेत सहा हजार कोटी रुपयांचा गैरव्यवहार २०१५ मध्ये उघडकीस आला होता. या प्रकरणी करचुकवेगिरी प्रतिबंधक नियमांचे पालन न करणे आणि संशयास्पद व्यवहारांची माहिती न देणे याबद्दल बॅंकेला हा दंड करण्यात आला आहे. या गैरव्यवहाराचा तपास वित्तीय गुप्तचर विभागाने सुमारे तीन वर्षे केला आहे. यामध्ये बॅंकेने किमान पाच वेळा करचुकवेगिरी आणि परकी चलन व्यवहारांची माहिती दिली नसल्याचे समोर आले आहे. बॅंकेला २१ दिवसांचा अवधी हा दंड भरण्यास देण्यात आला आहे.

Web Title: arthavishwa news bank of baroda