बिल्डर, बॉलिवूड ‘सेबी’च्या रडारवर

पीटीआय
सोमवार, 14 ऑगस्ट 2017

शेल कंपन्यांच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

नवी दिल्ली - बाजार नियंत्रक मंडळ सेबीने आता शेल (बनावट) कंपन्यांच्या समभागांवर निर्बंध घालण्याची कारवाई केल्यानंतर या शेल कंपन्यांसंबंधीच्या व्यक्ती तपासाच्या फेऱ्यात येणार आहेत. यामध्ये बांधकाम व्यावसायिक, शेअर दलाल, सिनेसृष्टीतील काही मातब्बर यांचा समावेश आहे. काळ्या पैशाला पांढरा बनविण्यात अनेक संस्थांचा हातभार असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या तपासासाठी सध्या अनेक तपास यंत्रणा कार्यरत आहेत. 

‘सेबी’ने आतापर्यंत भागधारकांच्या यादीत समाविष्ट ३३१ शेल कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस पाठविली आहे. तर भागधारकांच्या यादीत नसलेल्या संशयास्पद १०० गैरसूचीबद्ध कंपन्यांवर सध्या कारवाई सुरू आहे. सेबीने शेल तसेच संशयास्पद कंपन्यांच्या शेअर बाजारातील व्यवहारांवर निर्बंध आणल्यानंतर काही कंपन्यांनी सुरक्षा व अपीलीय लवादाकडे (सॅट) धाव घेत आव्हान दिले होते. लवादाने या कंपन्यांच्या बाजूने निर्णय देत ‘सेबी’ नियमांचे उल्लंघन करत असल्याबाबत तपास करण्यास परवानगी दिली.

यावेळी काही कंपन्यांनी शेल कंपन्या नसल्याचा दावा लवादापुढे केला. 
याबाबत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार काही बड्या कंपन्यांही मनी लाँडरिंग तसेच काळ्या पैशाल बेकायदा व्यवहारात आणण्याच्या प्रयत्नात शेल कंपन्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे काम करत आहेत. काही दलाल या संशयास्पद कंपन्यांच्या यादीत आहेत. या संपूर्ण साखळीचा तपासही सेबी करत असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. काही शेअर दलालांची चौकशी सुरू झाल्याने शेअर बाजारात सध्या अस्वस्थतेचे वातावरण असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. 

शेअर बाजाराच्या इतिहासात प्रथमच ‘सेबी’ने ३३१ शेल कंपन्यांच्या ट्रेडिंगवर निर्बंध आणल्याने शेअर बाजारामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सेबीच्या या कार्यवाहीने अल्पसंख्याक भागधारकांच्या हिताचे रक्षण होणार आहे. सेबीसह प्राप्तिकर विभाग, सक्तवसुली संचालनालय तसेच गंभीर फरवणूक तपासणी कार्यालय (एसएफआयओ) आदी यंत्रणाही काळ्या पैशांच्या कारवाईत कार्यरत आहेत. 

कंपन्यांची नावे सार्वजनिक करणार नाही
ज्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात शेल कंपन्यांचे काम केले अशांमध्ये बांधकाम व्यवसाय, कमॉडिटीज व शेअर ब्रोकिंग, फिल्म व टेलिव्हिजन, प्लॅंटेशन तसेच बिगर बॅंकिंग वित्तीय सेवांसंबंधी संस्था आदींचा समावेश आहे. सध्या बिल्डर व बॉलिवूडमधील काही कंपन्यांवर सेबीने कारवाई करण्यास सुरवात केली आहे. यामध्ये काही कंपन्यांनी नोटाबंदीनंतर संशयास्पद व्यवहार केल्याचेही समोर आले आहे.  सध्या बांधकाम व्यवसाय व बॉलिवूडमधील ५०० कंपन्यांची तपासणी सुरू असून यामधील काही सार्वजनिक कंपन्यांची नावे सार्वजनिक करता येणार नाहीत, असे सेबीच्या अधिकाऱ्याने सांगितले. यामुळे या प्रकरणाची संवेदनशीलता वाढून त्याचा तपासावर परिणाम होण्याची शक्‍यता असल्याचे या वेळी सांगण्यात आले.

Web Title: arthavishwa news builder bollywood on sebi radar