व्यापार युद्धाचे सावट

पीटीआय
गुरुवार, 5 एप्रिल 2018

अमेरिका-चीनकडून पुन्हा आयातीवर जादा कर 
बीजिंग - अमेरिकेच्या १०६ उत्पादनांवर चीनने २५ टक्के कर आकारण्याचा निर्णय घेतला असून, अमेरिकेतून होणाऱ्या ५० अब्ज डॉलरच्या आयातीवर हा कर लागू असेल. यामुळे अमेरिका आणि चीन व्यापार युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. 

अमेरिका-चीनकडून पुन्हा आयातीवर जादा कर 
बीजिंग - अमेरिकेच्या १०६ उत्पादनांवर चीनने २५ टक्के कर आकारण्याचा निर्णय घेतला असून, अमेरिकेतून होणाऱ्या ५० अब्ज डॉलरच्या आयातीवर हा कर लागू असेल. यामुळे अमेरिका आणि चीन व्यापार युद्धाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहेत. 

ट्रम्प प्रशासनाने चीनमधून आयात होणाऱ्या १ हजार ३०० उत्पादनांवर जादा कर आकारण्याची घोषणा केली आहे. या उत्पादनांची यादी अमेरिकेने जाहीर केली आहे. याला प्रत्युत्तर म्हणून चीनने अमेरिकेच्या १०६ उत्पादनांवर २५ टक्के कर आकारण्याचा निर्णय घेतला. यात विमाने, मोटारीसह अन्य उत्पादनांचा समावेश आहे. चीनच्या सीमा शुल्क आयोगाने हा निर्णय घेतला आहे. अमेरिकेतून आयात होणाऱ्या ५० अब्ज डॉलरच्या मालावर २५ टक्के लागू असेल. अमेरिका सरकार चीनच्या उत्पादनांवर ज्यावेळी कर आकारणी करेल, त्या वेळी चीनकडून हा कर लागू करण्याची तारीख निश्‍चित होईल. 

याआधी अमेरिकेने चीनच्या पोलाद आणि ॲल्युमिनियमवर जादा कर आकारला होता. याला प्रत्युत्तर म्हणून चीनने अमेरिकेच्या ३ अब्ज डॉलरच्या आयातीवर जादा कर लागू केला. यामध्ये वाईन, पोर्कसह १२८ अमेरिकी उत्पादनांचा समावेश होता. यानंतर चीनने अमेरिकेच्या उत्पादनांवर जादा कर आकारल्यास त्याला प्रत्युत्तर म्हणून चीनच्या उत्पादनांवर जादा कर आकारण्याचे सूतोवाच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते.  

डब्लूटीओमध्ये चीनचे आव्हान 
चीनच्या वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे, की चीनने विरोध करूनही अमेरिकेने चीनच्या उत्पादनांवर जादा कर आकारला आहे. अमेरिकेचे हे धोरण एककल्ली असून, केवळ स्वहित रक्षणाचे आहे. याला चीनचा विरोध असून, आम्ही याचा निषेध करतो. याला जागतिक व्यापार संघटनेत (डब्लूटीओ) आव्हान देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

प्रस्तावित जादा कर 
अमेरिका                      चीन
१३००                          १०६
चिनी उत्पादने       अमेरिकी उत्पादने

Web Title: arthavishwa news business war america and chin