निमशहरी, ग्रामीण भागातील ग्राहक ‘होंडा’कडून ‘क्‍लिक’

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 जुलै 2017

पुणे - महाराष्ट्रात स्कूटरची मोठी बाजारपेठ असून, स्कूटरची मागणी आता शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही विस्तारत आहे. हीच बाब लक्षात घेऊन होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.ने निमशहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना डोळ्यांसमोर ठेवून ‘क्‍लिक’ ही ११० सीसीची गिअरलेस स्कूटर आज येथे सादर केली. 

पुणे - महाराष्ट्रात स्कूटरची मोठी बाजारपेठ असून, स्कूटरची मागणी आता शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही विस्तारत आहे. हीच बाब लक्षात घेऊन होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.ने निमशहरी आणि ग्रामीण भागातील ग्राहकांना डोळ्यांसमोर ठेवून ‘क्‍लिक’ ही ११० सीसीची गिअरलेस स्कूटर आज येथे सादर केली. 

महाराष्ट्रातील बाजारपेठांमध्ये आघाडीचे स्थान मिळवत ही गाडी आता मुख्य शहरांच्या पलीकडे जाऊन पोचेल, असे मत कंपनीच्या विक्री आणि वितरण विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंग गुलेरिया यांनी व्यक्त केले. ‘‘महाराष्ट्रातील दुचाकीच्या बाजारपेठेत ४० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त प्रमाणात स्कूटरची विक्री होते. या राज्यात ‘स्कूटरायझेशन’ सर्वांत आधी स्वीकारण्यात आले असून, येथील ग्राहकांची मागणी आणि त्यांच्या गरजाही वाढत आहेत. नव्या ‘क्‍लिक’च्या सादरीकरणाद्वारे ‘स्कूटरायझेशन’मध्ये पुढचे पाऊल टाकले गेले आहे. ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आणि मास मोटरसायकल यांच्यातील किमतीचे अंतर आता ‘होंडा’ने मोडून काढले आहे. ‘क्‍लिक’ ही स्कूटर दैनंदिन प्रवासासाठीचा नवा पर्याय ठरेल, असा विश्‍वास वाटतो,’’ असे ते म्हणाले. 

नव्या गाडीच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलताना ते पुढे म्हणाले, की ‘क्‍लिक’ला चाकांचा विशेष ब्लॉक पॅटर्न आहे. यामुळे ही दुचाकी खराब रस्त्यांवर कोणत्याही हवामानात जास्त पकड आणि चांगले नियंत्रण राखते. याचे ट्यूबलेस टायर अधिक टिकाऊ असून, विस्तारीत फूटबोर्ड, सीटखाली स्टोरेजसाठी देण्यात आलेली जागा आणि रेअर कॅरिअर यामुळे आरामदायीपणात वाढ होतेच, शिवाय वजन वाहून नेण्याची क्षमताही वाढते. कमी उंचीवरील सीट आणि वजनाला हलकी असलेली ‘क्‍लिक’ वाहतूक कोंडी; तसेच अरूंद गल्ल्यांमधूनही सहजपणे वाट काढू शकते. ‘क्‍लिक’ या गाडीचे उत्पादन राजस्थानातील होंडाच्या प्रकल्पात केले जाते. जूनअखेरीस प्रथम राजस्थानात सादर केल्यानंतर, ही गाडी आता महाराष्ट्रात उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्टॅंडर्ड आणि ग्राफिक प्रकारात ही गाडी रु. ४३,०७५ आणि रु. ४३,५६९ रुपये (एक्‍स शोरूम, पुणे) अशा किमतीत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Web Title: arthavishwa news click scooter launch by honda