दोन लाख कोटींचे धनादेश रखडले

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

संपामुळे देशभरातील बॅंकांची सेवा कोलमडली

मुंबई - खासगीकरण आणि विलीनीकरणाविरोधात कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता.२२) पुकारलेल्या संपामुळे सार्वजनिक बॅंकांची सेवा कोलमडली. सार्वजनिक बॅंकांच्या देशभरातील जवळपास ८० टक्के शाखांचे दैनंदिन कामकाज ठप्प झाले. सेवा शाखेतील कर्मचाऱ्यांअभावी आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत जवळपास दोन लाख कोटींचे धनादेश वटले नाहीत. 

सार्वजनिक बॅंकिंग क्षेत्रातील नऊ युनियन्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या युनायटेड फोरम ऑफ बॅंक युनियन्सने संपाची हाक दिली होती. राज्यातील सर्वच २२ सार्वजनिक बॅंका आणि चार खासगी बॅंका आणि २ ग्रामीण बॅंकांमधील चतुर्थ श्रेणीपासून वरिष्ठ पातळीपर्यंत सर्व स्तरातील ९० टक्के कर्मचारी ssआणि अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला. 

मुंबई महानगर प्रदेशात सार्वजनिक बॅंकांच्या २५ हजारांहून अधिक शाखा आहेत. यामधील ग्राहकांना संपाचा फटका बसला. कोटक महिंद्रा बॅंकेतील आयएनजी वैश्‍य बॅंकेच्या ३०० कर्मचाऱ्यांनी संपाला पाठिंबा दर्शवला असल्याचे युनियनने म्हटले आहे. एसबीआयमधील विविध युनियन्सचे १०० टक्के कर्मचारी सहभागी झाल्याचे एसबीआयची सेवा खंडित झाली होती.

पुन्हा दोन दिवसांचा संप 
संपाबाबत सरकारने गांभीर्याने विचार केला नाही तर ऑक्‍टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये सलग दोन दिवसांचा संप करण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

Web Title: arthavishwa news demand draft stop by bank strike