वर्षाच्या सुरवातीलाच सेन्सेक्‍सची निराशा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 जानेवारी 2018

मुंबई - गेल्या आठवड्यातील तेजीने वधारलेल्या शेअर्सची विक्री करून गुंतवणूकदारांनी नफावसुली केल्याने सोमवारी (ता.१) सेन्सेक्‍समध्ये २४४.०८ अंशांची घसरण झाली. नव्या वर्षाच्या पहिल्याच सत्रात निराशाजनक सुरवात करणारा सेन्सेक्‍स दिवसअखेर ३३, ८१२.७५ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत ९५.१५ अंशांची घसरण नोंदवण्यात आली. या पडझडीत निफ्टीने १० हजार ५०० अंशांची पातळी तोडली. निफ्टी १० हजार ४३५.५५ अंशांवर बंद झाला. 

वित्तीय तूट वाढण्याचा अंदाज व्यक्त करण्याय येत आहे. जागतिक बाजारात खनिज तेलाच्या वाढत्या किमतींनी गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे. त्यामुळे वर्षाच्या पहिल्याच सत्रात विक्री करून गुंतवणूक काढून घेण्यावर त्यांनी भर दिल्याचे शेअर दलालांनी सांगितले. जागतिक बाजारात खनिज तेलाच्या किमतींनी प्रतिबॅरल ६० डॉलरचा स्तर गाठला आहे. बॅंका, वाहन उत्पादक कंपन्यांच्या शेअरमध्ये विक्रीचा मारा दिसून आला. भांडवली वस्तू उत्पादक कंपन्यांचे शेअर्स, रियल्टी, हेल्थकेअर, ग्राहकोपयोगी वस्तू आदी शेअर्समधील खरेदीमुळे निर्देशांकातील घसरणीला काही प्रमाणात ब्रेक लागला. 

बाजारात टीसीएसच्या शेअरमध्ये सर्वाधिक घट झाली. त्याखालोखाल इंड्‌सइंड बॅंक, हिंदुस्थान युनिलिव्हर, एचडीएफसी, टाटा स्टील, ओएनजीसी, अदानी पोर्ट, आयसीआयसीआय बॅंक, रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेंट, एचडीएफसी बॅंक, एसबीआय, कोटक, येस बॅंक आदी शेअरमध्ये घसरण झाली. वाहन उत्पादक कंपन्यांमध्ये टाटा मोटर्स, महिंद्रा, मारुती सुझुकी, हिरो मोटो कॉर्प आदी शेअर घसरले. नववर्षानिमित्त आशिया 
आणि युरोपातील प्रमुख शेअर बाजार बंद होते. 

चलनाला उभारी 
चलन बाजारात रुपयाने मात्र २०१८ सालाची झोकात सुरवात केली. डॉलरच्या तुलनेत रुपया १९ पैशांनी वधारला आणि ६३.६८ वर बंद झाला. गेल्या पाच महिन्यांतील रुपयाचा सर्वोत्तम स्तर आहे. गेल्या तीन सत्रांत डॉलरच्या तुलनेत रुपया ४७ पैशांनी वधारला आहे. आर्थिक सुधारणांमुळे देशात परकी गुंतवणुकीचा ओघ वाढणार असून रुपयाला बळ मिळेल, असा अंदाज चलन बाजारातील जाणकारांकडून व्यक्त करण्यात 
येत आहे.

Web Title: arthavishwa news disappointment of the Sensex at the beginning of the year