‘डीएसके बेनेली’ची ट्रॅक फोकस्ड बाइक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

पुणे - देशातील अनेक ट्रेड शो, प्रदर्शने आणि सुपरबाइक महोत्सवांमधून प्रदर्शित झालेली ‘डीएसके बेनेली ३०२ आर’ ही ट्रॅक फोकस्ड बाइक भारतीय रस्त्यांवर दिसणार आहे. 

‘डीएसके बेनेली ३०२ आर’ ही बाइक अँटी-लॉक ब्रेक सिस्टिमने परिपूर्ण असून, ‘डीएसके मोटोव्हील्स’कडून ही सुपरबाइक भारतात आणली जात आहे. सुपरबाइकच्या शर्यती डोळ्यापुढे ठेवून तयार केलेली अर्थात ट्रॅक फोकस्ड अशी भारतातील पहिलीच सुपरबाइक आहे. यात तंत्रज्ञान आणि रचनेचा चांगला मेळ घालण्यात आला आहे. आकर्षक दर्शनीरूप आणि दणकट बांधणी यामुळे ही बाइक लक्ष वेधून घेते.

डीएसके मोटोव्हील्सचे अध्यक्ष शिरीश कुलकर्णी म्हणाले, की भारतातील सुपरबाइकप्रेमींची सर्वाधिक पसंती असलेला ब्रॅंड म्हणून ‘डीएसके बेनेली’ने स्वत:ला प्रस्थापित केले आहे. आम्ही बाजारात आणलेल्या शक्तिशाली बाइकना लक्षणीय प्रतिसाद मिळाला. आता डीएसके बेनेली ३०२ आर ही आमची पहिली फुल-फेअर्ड (या प्रकारच्या बाइकमध्ये सर्व यांत्रिक भाग झाकलेले असतात) सुपरबाइक देशातील मध्यम आकाराच्या बाजारपेठेचा चेहरा बदलेल. आमच्या यापूर्वीच्या सुपरबाइकप्रमाणे या नव्या सुपरबाइकलाही चांगला प्रतिसाद मिळेल, याची खात्री वाटते.

डीएसके बेनेलीच्या सर्व शोरूममध्ये ही बाइक विक्रीसाठी असून, ती पांढरा रोझो, लाल नेरो आणि चंदेरी र्व्हडे अशा तीन रंगांत उपलब्ध आहे.

Web Title: arthavishwa news DSK Beneli 302 R track focused bike

टॅग्स