आणखी पाच राज्यांत 15 पासून ई-वे बिल

पीटीआय
बुधवार, 11 एप्रिल 2018

नवी दिल्ली - उत्तर प्रदेश, गुजरात आणि केरळसह पाच राज्ये राज्यांतर्गत वाहतुकीसाठी १५ एप्रिलपासून ई-वे बिल लागू करणार आहेत. 

केंद्र सरकारने आंतरराज्य वाहतुकीसाठी १ एप्रिलपासून ई-वे बिल लागू केले आहे. एक राज्यातून दुसऱ्या राज्यात ५० हजार रुपयांपेक्षा अधिक किमतीचा माल नेण्यासाठी ई-वे बिल बंधनकारक आहे. याचप्रमाणे राज्यांतर्गत माल वाहतुकीसाठी ई-वे बिल बंधनकारक करण्याचा निर्णय काही राज्यांनी घेतली आहेत. पहिल्या टप्प्यात आंध्र प्रदेश, तेलंगण, गुजरात, केरळ आणि उत्तर प्रदेश या पाच राज्यांमध्ये १५ एप्रिलपासून ई-वे बिल लागू होईल.

Web Title: arthavishwa news e-way bill