आर्थिक मंदी वास्तववादी

वृत्तसंस्था
बुधवार, 20 सप्टेंबर 2017

एसबीआयच्या सर्वेक्षणातील माहिती; खर्च वाढविण्याचे आवाहन 
नवी दिल्ली - आर्थिक मंदी ही केवळ तांत्रिक नव्हे तर वास्तवातील असून, यामधून बाहेर पडण्यासाठी सरकारला खर्चावर लक्ष्य केंद्रित करून तो वाढण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, असे ‘एसबीआय रिसर्च’ने आपल्या अहवालात म्हटले आहे. 

सप्टेंबर २०१६ पासून भारतीय अर्थव्यवस्था सुस्तावलेल्या स्थितीत आहे. जुनच्या तिमाहीत देशाचा विकासदर ५.७ टक्‍क्‍यांवर आला. देशाच्या आर्थिक विकासाच्या दृष्टीने ही चिंताजनक बाब असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. सप्टेंबर २०१६ पासून सुरू झालेला मंदीचा प्रवास चालू आर्थिक वर्षाच्या सुरवातीला आणखी खडतर झाला. त्यामुळे ही आर्थिक मंदी तांत्रिक असून, ती केवळ काही काळापुरती नसून ती दीर्घकालीन असल्याची भितीही एसबीआय रिसर्चच्या अहवालात व्यक्त करण्यात आली आहे. या आधी भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी भारतीय अर्थव्यवस्थेतील मंदी तांत्रिक असल्याचे सांगितले होते.

सरकारच्या हाती समाधान
सध्याच्या आर्थिक मंदीचे समाधानही सरकारच्या हाती असल्याचे एसबीआय सर्व्हेच्या अहवालात म्हटले आहे. काळाची गरज ओळखून सार्वजनिक खर्च वाढविल्यास यातून लवकर मार्ग निघेल. सध्याची भारतीय अर्थव्यवस्था ३.४ ट्रिलीयन डॉलर इतकी झाली असून, अजूनही बायबॅकची गरज असल्याचे अहवालात म्हटले आहे. वित्तीय तूट लक्षा घेऊन अर्थसंकल्पाचे नियोजन करणे गरजेच असल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. आगामी काळात आर्थिक सुधारणा घडवून आणताना काटेकोर अंमलबजावणी व कालसुसंगत निर्णयांची जोड द्यावी लागणार आहे.

Web Title: arthavishwa news The economic downturn is realistic