तुमची आर्थिक साक्षरता तुम्हीच तपासा

सुहास राजदेरकर
सोमवार, 2 एप्रिल 2018

पालक आपल्या पाल्यांच्या परीक्षेतील गुणांविषयी खूप दक्ष असतात. परंतु पालकांची आर्थिक साक्षरता परीक्षा घेतली, तर बहुतेक पालकांचे गुण काठावर पास होण्याइतकेसुद्धा नसण्याची शक्‍यता आहे. नुकतेच २०१८-१९ हे आर्थिक वर्ष सुरू झाले आहे. या नव्या वर्षासाठी सोबत दिलेल्या तक्‍त्यानुसार तुमची आर्थिक साक्षरता तुम्हीच तपासा आणि योग्य ते संकल्प करून पुढील वर्षी पैकीच्या पैकी गुण मिळविण्याचा प्रयत्न करा. जर सर्व घटकांची उत्तरे नकारार्थी असतील, तर ‘शून्य गुण’; तसेच संपूर्ण सकारात्मक असतील तर कमाल १००० गुण मिळतील. 

एक प्रातिनिधिक उदाहरण घेऊन गुण काय मिळतात, ते पाहूया -
पालकांची परीक्षा असल्यामुळे ‘पासिंग परसेंटेज’ ५० टक्के आहे. तसेच ‘निगेटिव्ह मार्क’ नाहीत. सोबतच्या उदाहरणातील पालक जरी ५३ टक्के मिळवून काठावर पास झाले असले, तरी जेव्हा आपण मुलांकडून ९० टक्‍क्‍यांची अपेक्षा करतो, तेव्हा आपल्यालासुद्धा तेवढे मार्क मिळायला हरकत नसावी. किमान तसा प्रयत्न तरी नक्कीच करायला हवा. तुम्ही काही घटक वाढवू शकता. त्यात आर्थिक नियोजन व गुंतवणुकीचा सहा महिन्यांतून एकदा आढावा घेता का?, स्थावर मालमत्ता रिकामी ठेवून स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेत आहात का?, बॅंकेच्या बचत खात्यात जरुरीपेक्षा बरेच जास्त पैसे ठेवले आहेत का? यांचा समावेश करता येऊ शकतो. थोडक्‍यात काय, तर सोबतच्या तक्‍त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे आर्थिक नियोजन करण्यापासून ते नॉमिनेशन; तसेच इच्छापत्र करण्यापर्यंत सर्व गोष्टी वेळेवर कटाक्षाने केल्यामुळे संपत्तीच्या वाढीबरोबरच मनःशांतीसुद्धा मिळेल. पाहा, विचार करा... आतापासून म्हणजे नव्या आर्थिक वर्षापासून याची सुरवात करायला काय हरकत आहे?

Web Title: arthavishwa news Financial literacy checking