घाऊक महागाईत वाढ

पीटीआय
शुक्रवार, 15 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली - ऑगस्टमध्ये घाऊक महागाई ३.२४ टक्‍क्‍यांनी वाढून चार महिन्यांच्या उच्चांकावर पोचली. अन्नधान्यांचे विशेषत: कांदा व अन्य पालेभाज्यांच्या किंमती वाढल्या होत्या. यासोबतच पेट्रोलच्या किंमतीमध्येही वाढ होत आहे. जुलैमध्ये घाऊक महागाई १.८८ टक्‍क्‍यांवर होती. या आधी एप्रिलमध्ये घाऊक महागाई ३.८४ टक्के झाली होती.

वाणिज्य मंत्रालयाने घाऊक महागाईची आकडेवारी जाहीर केली. ऑगस्टमध्ये कांद्याच्या भावामध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. कांद्याचे भाव - ९.५० वरून ८८.४६ टक्के वाढल्याचे चित्र आहे. तर अन्नधान्यांची महागाई ५.७५ टक्के झाली. जुलैप्रमाणेच ऑगस्टमध्येही पालेभाज्या सर्वाधिक महागल्या. पालेभाज्यांची घाऊक महागाई ४४.९१ टक्‍क्‍यांवर होती. फळांची घाऊक महागाई ७.३५ टक्‍क्‍यांवर पोचली. 

अंडी, मटण, माशांचे भाव वाढले
ऑगस्टमध्ये प्रथिनयुक्त पदार्थामध्ये अंडी, मटण, मासे आदींचे भावे वाढले होते. प्रथिनयुक्त पदार्थांची घाऊक महागाई ३.९३ टक्‍क्‍यांवर पोचली. खनिजांची महागाई मात्र घसरली होती. याचसोबत ऊर्जा व इंधन क्षेत्रातील महागाई ऑगस्टमध्येही वाढल्याचे चित्र आहे. पेट्रोलची घाऊक महागाई २४.५५ टक्‍क्‍यांवर असून ऊर्जा क्षेत्रातही घाऊक महागाईत वाढ झाली.

Web Title: arthavishwa news Growth in wholesale inflation