'जीएसटी" सुलभतेसाठी औद्योगिक संघटनांना सोबत घेणार - राजीव जलोटा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

मुंबई - वस्तू आणि सेवा कराची (जीएसटी) सुलभपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रमुख औद्योगिक संघटनांना सोबत घेतले जाईल, अशी माहिती राज्याचे जीएसटी आयुक्त राजीव जलोटा यांनी दिली. आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजने जीएसटी अंमलबजावणीला 50 दिवस पूर्ण झाल्याबद्दल चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्यामध्ये जलोटा बोलत होते.

जीएसटीएन नोंदणी करणाऱ्यांची व्यावसायिकांची संख्या वाढत आहे. सीमाशुल्क, उत्पादन शुल्क, सेवा कर आणि विक्री कर रद्द झाले असून त्याऐवजी वस्तू आणि सेवा कर अस्तित्वात आला आहे. विविध करासंबधीचे सर्व विभाग जीएसटीमध्ये परावर्तीत होत आहेत. अनेकांसाठी ही प्रणाली नवीन असल्यामुळे अधिकाऱ्यांना प्रशिक्षिण दिले जात आहे. नोंदणी प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्याला सरकारने प्राधान्य दिले असल्याचे जलोटा यांनी सांगितले. ते म्हणाले की, व्यवसायिकांना "जीएसटी"संबधीच्या भेडसावणाऱ्या समस्या सोडवण्यासाठी आतापर्यंत जीएसटी विभागाने स्थानिक पातळीवर शिबिरांचे आयोजन केले आहे. बड्या उद्योजकांपासून सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी विभागनिहाय मार्गदर्शन शिबीर घेण्यात आली. उद्योजकांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या औद्योगिक संघटनांना सोबत घेण्याची सरकारची तयारी आहे. "आयएमसी"सारख्या चेंबर्स आणि इतर संघटनांना लवकरच भागिदार केले जाईल, असे जलोटा यांनी सांगितले. यावेळी "आयएमसी"चे अध्यक्ष ललित कनोडिया, कर सल्लागार भावना दोषी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: arthavishwa news GST will take the industrial organizations to facilitate