एचडीएफसी बॅंकेची पीओएस मशिन

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 23 ऑगस्ट 2017

मुंबई - कॅशलेस व्यवहारांमधील महत्त्वाचा घटक असलेल्या व्यावसायिकाला सर्वच डिजिटल पेमेंट मंचावरील सेवांचा लाभ मिळावा, यासाठी एचडीएफसी बॅंकेने ‘डिजीपीओएस’ मशिन उपलब्ध केली आहे. बॅंकेच्या विद्यमान चार लाख ‘पीओएस’धारक व्यावसायिकांना निशुल्क त्यांच्या मशिन ‘डिजीपीओएस’मध्ये बदलून घेता येतील, असे बॅंकेने म्हटले आहे. 

‘डिजीपीओएस’चा व्यावसायिकांना आणि ग्राहकांना फायदा होणार आहे. यूपीआय, भारत क्‍यूआर, एसएमएस पे, पेझॅप या मंचावरून आर्थिक व्यवहार करता येणार आहेत. त्याचबरोबर डेबिट आणि क्रेडिट कार्डसच्या माध्यमातूनसुद्धा पेमेंट करता येणार आहे. नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ झाली आहे. 

ग्राहकांकडे ई-वॉलेट, कार्ड तसेच पेमेंट सेवा देणाऱ्या कंपन्यांचे पर्याय असतात. त्यामुळे व्यावसायिकांनाही विविध प्रकाराची डिव्हाइस बाळगावी लागत होती. ‘डिजीपीओएस’ सर्व प्रकारच्या सेवांना सहाय्य करेल.

Web Title: arthavishwa news HDFC bank pos machine