‘होंडा कार्स’चा उद्यापासून ‘ऑल इंडिया मेगा सर्व्हिस कॅम्प’ 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 जानेवारी 2018

पुणे - होंडा कार्स इंडिया लि.ने ८ ते १४ जानेवारीदरम्यान ‘ऑल इंडिया मेगा सर्व्हिस कॅम्प’ आयोजित केला आहे. आपल्या ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी कंपनीने राष्ट्रीय पातळीवर सर्व सेवा नेटवर्कमध्ये हा कॅम्प आयोजित केला आहे. आठवडाभर चालणाऱ्या या कॅम्पमध्ये ग्राहकांना कंपनीकडून विविध सेवांचा लाभ घेता येणार आहे. ग्राहकांना कंपनीकडून ‘५० पॉइंट कार चेकअप, फ्री टॉप वॉश, ‘लकी ड्रॉ’च्या माध्यमातून इंजिन ऑइल कूपन अशा विविध आकर्षक ऑफर देण्यात येणार आहेत. शिवाय जुन्या वाहनांचे त्वरित मूल्यांकन करून देण्यात येणार आहे.

पुणे - होंडा कार्स इंडिया लि.ने ८ ते १४ जानेवारीदरम्यान ‘ऑल इंडिया मेगा सर्व्हिस कॅम्प’ आयोजित केला आहे. आपल्या ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी कंपनीने राष्ट्रीय पातळीवर सर्व सेवा नेटवर्कमध्ये हा कॅम्प आयोजित केला आहे. आठवडाभर चालणाऱ्या या कॅम्पमध्ये ग्राहकांना कंपनीकडून विविध सेवांचा लाभ घेता येणार आहे. ग्राहकांना कंपनीकडून ‘५० पॉइंट कार चेकअप, फ्री टॉप वॉश, ‘लकी ड्रॉ’च्या माध्यमातून इंजिन ऑइल कूपन अशा विविध आकर्षक ऑफर देण्यात येणार आहेत. शिवाय जुन्या वाहनांचे त्वरित मूल्यांकन करून देण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त काही अतिरिक्त सेवांवर सवलत देण्यात येणार असून, काही भेटवस्तू जिंकण्याची संधी मिळणार आहे, असे कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी योइचिरो उनो यांनी म्हटले आहे.

Web Title: arthavishwa news honda cars all india mega service camp