‘होंडा टू व्हीलर्स’ गुंतवणार चालू वर्षात आठशे कोटी

यशपाल सोनकांबळे
बुधवार, 11 एप्रिल 2018

नवी दिल्ली - आर्थिक वर्षात सर्वाधिक दुचाकी विक्रीचा विक्रम करणारी होंडा मोटारसायकल ॲण्ड स्कूटर इंडिया एकमेव कंपनी ठरली आहे. कंपनी आर्थिक वर्ष २०१८-१९ मध्ये भारतात सुमारे ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याची माहिती होंडा मोटारसायकल ॲण्ड स्कूटर इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष मिनोरू काटो यांनी मंगळवारी ‘सकाळ’शी बोलताना दिली. 

भारतीय बाजारपेठांमधील विक्री आणि उद्दिष्टांसंदर्भात होंडा मोटारसायकल ॲण्ड स्कूटर इंडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष यदविंदर सिंह गुलेरिया म्हणाले, ‘‘मागील आर्थिक वर्ष होंडा कंपनीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरले. चार नवीन मॉडेल विक्रीसाठी बाजारात आणली. परिणामी दुचाकी आणि स्कूटर विक्रीत दहा लाख ग्राहक जोडता आले. गेल्या वर्षी सुमारे ६१ लाख २३ हजार ८८६ दुचाकींची विक्रमी विक्री झाली. चालू आर्थिक वर्षातदेखील दहा लाखांच्या वर दुचाकी विक्री आणि निर्यात करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. शहरासह ग्रामीण भागात विक्रीला प्राधान्य असणार आहे.’’

‘ॲक्‍टिव्हा ५ जी’ २०२० मध्ये बाजारात
‘बीएस सहा’ इंधनावरील नवीन स्कूटर मॉडेल ‘ॲक्‍टिव्हा ५ जी’ बाजारात विक्रीसाठी येत्या २०२० मध्ये दाखल होणार आहे. याचबरोबर देशभरात सहा हजार अधिकृत होंडा दुचाकी विक्री केंद्रांचे अत्याधुनिकीकरण सुरू करण्यात येणार आहे. तसेच जुन्या दुचाकींच्या खरेदीसाठी ‘बेस्ट डील नेटवर्क’ची सुमारे २५० केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत.

Web Title: arthavishwa news honda two wheelers investment 800 crore