ह्युंदाई चालू वर्षात पाच लाख मोटारी विकणार

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

मुंबई - आयटेन, एक्‍सेंट, क्रेटा या मोटारींनी बाजारातील पकड मजबूत करणाऱ्या ह्युंदाईने चालू वर्षात पाच लाखांहून अधिक मोटार विक्रीचे उद्दिष्ट ठेवले आहे. कंपनीने बुधवारी (ता.२३) सेडान श्रेणीतील लोकप्रिय व्हेर्ना मोटारीचे पाचवे अद्ययावत मॉडेल सादर केले. तरुणाईची आवड आणि तंत्रज्ञानाचा मेळ साधत नवी व्हेर्ना विकसित केली आहे. नव्या वेरणाच्या आगाऊ नोंदणीला मिळणारा प्रतिसाद पाहता वर्षाचे विक्री उद्दिष्ट पूर्ण करण्यास हातभार लावेल, असा विश्‍वास कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केला आहे. 

२३ वर्षांत ह्युंदाईने ६६ देशांत तब्बल ८८ लाख व्हेर्ना मोटारींची विक्री केली आहे. १९९४ मध्ये सेडान श्रेणीतील वेरणाला कंपनीने सर्वप्रथम लाँच केले होते. ‘नेक्‍स्टजेन व्हेर्ना’ हे पाचवे सुधारित मॉडेल आहे. या मोटारीत स्पोर्टी लूक, सुरक्षेचे सर्वोच्च मापदंड आणि स्मार्टकनेक्‍टसारख्या नव्या वैशिष्ट्ये आहेत. ही मोटार पेट्रोल, डिझेल, मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक या चार प्रकारांत आहे. एक्‍स शोरूम मुंबईची किंमत सात लाख ९९ हजार ९०० पासून आहे. व्हेर्नाने ग्राहकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. नव्या व्हेर्नाच्या पहिल्या २० हजार ग्राहकांना विशेष सवलत दिली जाईल, असे ह्युंदाई विक्री विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक पुनीत आनंद यांनी सांगितले. 

...तर किमती कमी होतील 
‘प्री जीएसटी’मध्ये ह्युंदायच्या विक्रीत वाढ झाल्याचे आनंद यांनी सांगितले. चालू वर्षात पाच ते साडेपाच लाख मोटारींची विक्री करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. नवी व्हेर्ना हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महत्त्वाची ठरेल, असा विश्‍वास आनंद यांनी व्यक्त केला. मोटारींवरील जीएसटी सेसबाबत सरकार फेरविचार करत आहे. सरकारने काही निर्णय घेतल्यास त्याचा फायदा ग्राहकांना देण्यासाठी ह्युंदाई त्या श्रेणीतील मोटारींच्या किमतींचा आढावा घेईल, असे त्यांनी सांगितले. 

Web Title: arthavishwa news Hyundai to sell 5 lakh motor in the current year