कॉसमॉसचे आय-एम बॅंकिंग ॲप

पुणे - कॉसमॉस बॅंकेच्या ‘आय-एम बॅंकिंग’ ॲपचे अनावरण राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या प्रसंगी बॅंकेचे संचालक कृष्णकुमार गोयल, व्यवस्थापकीय संचालक सुहास गोखले, अध्यक्ष मिलिंद काळे, बॅंकेचे उपाध्यक्ष गोविंद क्षीरसागर.
पुणे - कॉसमॉस बॅंकेच्या ‘आय-एम बॅंकिंग’ ॲपचे अनावरण राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले. या प्रसंगी बॅंकेचे संचालक कृष्णकुमार गोयल, व्यवस्थापकीय संचालक सुहास गोखले, अध्यक्ष मिलिंद काळे, बॅंकेचे उपाध्यक्ष गोविंद क्षीरसागर.

पुणे - महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या हस्ते कॉसमॉस को-ऑप. बॅंकेच्या ‘आय-एम बॅंकिंग’ या मोबाईल बॅंकिंग ॲपचे नुकतेच अनावरण करण्यात आले. बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे, उपाध्यक्ष गोविंद क्षीरसागर; तसेच बॅंकेच्या संचालक मंडळातील इतर सदस्य, व्यवस्थापकीय संचालक सुहास गोखले आदी या प्रसंगी उपस्थित होते.

राज्यपालांनी बॅंकेच्या माहिती तंत्रज्ञान विभागास भेट देऊन बॅंकेने अमलात आणलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचे कौतुक केले. कॉसमॉस बॅंकेचे ‘आय-एम बॅंकिंग’ मोबाईल ॲप हे अत्यंत सुरक्षित, सोपे असून कधीही, कोठेही उपलब्ध होणार आहे. या ॲपद्वारे फिक्‍स्ड व रिकरिंग ठेव खाते उघडणे, चेकबुक मागणी, रक्कम वर्ग करणे, सर्व प्रकारचे खाते उतारे मिळणे, इतर देयके अदा करणे अशा सर्व सेवा-सुविधा कोणत्याही स्मार्ट मोबाईल हॅंडसेटद्वारे उपलब्ध होणार आहेत, असे बॅंकेने म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com