औद्योगिक उत्पादनातील वाढ कायम

पीटीआय
शुक्रवार, 13 एप्रिल 2018

नवी दिल्ली - औद्योगिक उत्पादनातील वाढ फेब्रुवारीमध्ये सलग चौथ्या महिन्यात कायम राहिली. फेब्रुवारीत औद्योगिक उत्पादन ७.१ टक्‍क्‍यांवर पोचले असून, उत्पादन, कॅपिटल गुड्‌स आणि ग्राहकोपयोगी वस्तू या क्षेत्रांची चांगली कामगिरी याला कारणीभूत ठरली आहे. 

औद्योगिक उत्पादन निर्देशांकाच्या आधारे औद्योगिक उत्पादन मोजले जाते. फेब्रुवारी २०१७ मध्ये औद्योगिक उत्पादन १.२ टक्के होते. सुधारित आकडेवारीनुसार, औद्योगिक उत्पादन मागील आर्थिक वर्षात नोव्हेंबरमध्ये ८.५४ टक्के आणि जानेवारीत ७.४ टक्के आहे. एप्रिल ते फेब्रुवारी या कालावधीत औद्योगिक उत्पादन ४.३ टक्के आहे. त्याआधीच्या आर्थिक वर्षात याच कालावधीत ते ४.७ टक्के होते. औद्योगिक उत्पादन निर्देशांकात उत्पादन क्षेत्राचा वाटा ७७ टक्के आहे. उत्पादन क्षेत्रात फेब्रुवारीत ८.७ टक्के वाढ झाली आहे. 

औद्योगिक उत्पादन (टक्क्यांमध्ये)
फेब्रुवारी -  ७.१
एप्रिल ते फेब्रुवारी -  ४.३

Web Title: arthavishwa news industricl production increase