कांद्यामुळे महागाईचा भडका

पीटीआय
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

नवी दिल्ली - घाऊक बाजारात कांद्याच्या भावाने पन्नाशी गाठल्यामुळे नोव्हेंबरमध्ये घाऊक मूल्यावर आधारित महागाई दराने ३.९३ टक्‍क्‍यांपर्यंत मजल मारली आहे. ही गेल्या आठ महिन्यांतील महागाई निर्देशांकाची उच्चांकी पातळी आहे. गेल्या महिन्यात कांदे, भाजीपाल्याच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाल्यामुळे किचनचे बजेट कोलमडले होते. गेल्याच आठवड्यात रिझर्व्ह बॅंकेने महागाई वाढण्याची भीती व्यक्त केली होती. ग्राहकमूल्यावर आधारित महागाई निर्देशांकाने १५ महिन्यांचा उच्चांक गाठला असून, त्यापाठोपाठ घाऊक महागाईचा आलेख वाढत आहे. गेल्या महिन्यात कांद्याच्या किमतींमध्ये १७८ टक्‍क्‍यांनी वाढ नोंदविण्यात आली.

भाजीपाल्याच्या किमतींमध्ये ५९.८० टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. अंडी, मांस आणि मच्छीच्या दरांमध्ये मात्र घट झाल्याचे दिसून आले आहे. अन्नधान्य आणि कारखाना उत्पादनांमध्ये महागाई दर ४.१ टक्‍क्‍यापर्यंत वाढला आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात घाऊक महागाई निर्देशांक १.८२ टक्के होता. वाढत्या महागाईमुळे आगामी पतधोरणातील व्याजदर कपातीची शक्‍यता धूसर बनली आहे.

Web Title: arthavishwa news Inflation triggered by onions