इन्फोसिसचा शेअर तेजीत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

मुंबई - संस्थापक नंदन निलेकणी यांच्या घरवापसीकडे डोळे लावून बसलेल्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी इन्फोसिसच्या शेअरची जोरदार खरेदी केली. त्यामुळे सेन्सेक्‍स २८ अंशांनी वधारला आणि ३१ हजार ५९६ अंशांवर बंद झाला. निफ्टीत ४.५५ अंशांच्या वाढीसह ९ हजार ८५७ अंशांवर बंद झाला. 

इन्फोसिसच्या शेअर्समधील तेजीने निर्देशांकांना चालना मिळाली, तसेच आयटीतील इतर शेअर वधारले. दिवसअखेर इन्फोसिस दोन टक्‍क्‍यांनी वधारला. नंदन निलेकणी पुन्हा इन्फोसिसमध्ये सक्रिय होण्याची शक्‍यता वर्तवली आहे. त्यांच्या कमबॅकबरोबरच कंपनीच्या विद्यमान संचालक मंडळाची फेररचना होण्याची शक्‍यता आहे. म्युच्युअल फंड आणि बड्या संस्थात्मक गुंतवणूकदारांनी निलेकणींना परत आणण्यासाठी संचालकांवर दबाव टाकण्यास सुरवात केली आहे. आज फार्मा शेअर्समध्ये खरेदी दिसून आली. ज्यामुळे वोखार्ड, युनायटेड स्पिरीट्‌स, लुपिन, सन फार्मा, डीहीज लॅब, सिप्ला, कॅडिला आदी शेअर तेजीसह बंद झाले. त्याचबरोबर टाटा मोटर्स, एसबीआय, एलअँडटी, पॉवरग्रीड आदी शेअर्समध्ये वाढ झाली. 

Web Title: arthavishwa news infosys share fast