व्याजदर ‘जैसे थे’

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 एप्रिल 2018

मुंबई - रिझर्व्ह बॅंकेने रेपो दरात कोणताही बदल न करता ते सहा टक्‍क्‍यांवर स्थिर ठेवण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. सलग चौथ्या पतधोरणात रिझर्व्ह बॅंकेने व्याजदर बदललेले नाहीत. 

रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्या नेतृत्वाखालील पतधोरण समितीने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये व्याजदरात पाव टक्का कपात करून ते ६ टक्‍क्‍यांवर आणले होते. त्यानंतर सलग तीन द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदर स्थिर ठेवण्यात आले होते. आता सलग चौथ्या पतधोरणातही व्याजदरात बदल झाले नाहीत. चालू आर्थिक वर्षातील ही पहिलीच द्वैमासिक पतधोरण आढावा बैठक होती.  

समितीच्या बैठकीत व्याजदर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. चलनवाढ ४ टक्‍क्‍यांवर कायम ठेवण्याचे समितीचे उद्दिष्ट असून, यादृष्टीने समिती पावले उचलत आहे, असे पतधोरण समितीने म्हटले आहे. रिझर्व्ह बॅंक रेपो दराने बॅंकांना अल्प काळासाठी कर्ज देते. हा रेपो दर सहा टक्‍क्‍यांवर कायम आहे. याचवेळी रिझर्व्ह बॅंक रिव्हर्स रेपो दराने बॅंकांकडून पैसे घेते. हा दर ५.७५ टक्‍क्‍यांवर स्थिर आहे.

रिझर्व्ह बॅंकेची डिजिटल करन्सी 
बिटकॉइनसारख्या डिजिटल करन्सीला आळा घालण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेने डिजिटल करन्सीची नियमावली कठोर केली आहे. रिझर्व्ह बॅंकेने स्वत:ची डिजिटल करन्सी काढण्यासाठी एक समिती स्थापन केली आहे. जूनअखेर त्याचा अहवाल बॅंकेला प्राप्त होणार असून, यावर डिजिटल करन्सीबाबत निर्णय घेतला जाईल. 

रेपो दर ६ टक्के 
रिव्हर्स रेपो दर ५.७५ टक्के 

रिझर्व्ह बँकेच्या कारवाईच्या अधिकारांवर मर्यादा आहे. बॅंकांमधील गैरव्यवहारांच्या  पार्श्‍वभूमीवर कारवाईच्या अधिकाराबाबत सुस्पष्टता आवश्‍यक आहे.
- ऊर्जित पटेल, गव्हर्नर, रिझर्व्ह बॅंक

Web Title: arthavishwa news interest rate reserve bank of india