इन्फोसिसमध्ये परतण्यासाठी निलेकणी इच्छुक

वृत्तसंस्था
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

बंगळुरू - इन्फोसिसला सावरण्यासाठी संस्थापक नंदन निलेकणी यांनी गांभीर्याने विचार सुरू केला आहे. निलेकणी यांनी अमेरिकेचा नियोजित दौरा पुढे ढकलला आहे. ते इन्फोसिसमधील घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याची माहिती या घडामोडींशी संबधित दिली आहे. 

विशाल सिक्का यांच्या राजीनाम्यानंतर नव्या नेतृत्वाचा शोध इन्फोसिसकडून घेतला जात आहे. समभागधारक आणि संस्थात्मक गुंतवणूकदारांनी कंपनीची धुरा पुन्हा नंदन निलेकणी यांच्याकडे सोपवावी, अशी मागणी केली आहे. यामुळे संचालक मंडळावरील दबाव वाढला आहे. निलेकणी बिगर कार्यकारी अध्यक्ष म्हणून पुन्हा कंपनीमध्ये प्रवेश करतील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. निलेकणी परतल्यास कंपनीच्या संचालक मंडळाची पुनर्रचना होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे.

Web Title: arthavishwa news Interested in getting Nilekani back to Infosys