जन बॅंकेचे कामकाज सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 एप्रिल 2018

बंगळूर - जन स्मॉल फायनान्स बॅंकेने (आधीची जनलक्ष्मी फायनान्शियल सर्व्हिसेस) बॅंकिंग व्यवसायाची सुरवात केली आहे. जन बॅंक सुरवातीला १८ राज्यांमध्ये १९ शाखा उघडणार आहे. बॅंक जूनपर्यंत दोनशे आउटलेट सुरू करणार असून, यातील २५ टक्के ग्रामीण भागात उघडण्यात येतील. 

जन बॅंक आर्थिक समावेशतेचे उद्दिष्ट कायम ठेवत ग्राहकांची संख्या वाढविणार आहे. याविषयी जन ग्रुपचे अध्यक्ष रमेश रामनाथन म्हणाले, की जन ग्रुपचे प्रमुख उद्दिष्ट आर्थिक सर्वसमावेशकता आहे. डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेऊन बॅंकिंग कामकाज सुरू करण्यात येत आहे. आर्थिक समावेशकतेमधील दरी दूर करण्यासाठी नव्या संधी उपलब्ध करून देण्यात येतील. बॅंकेच्या सूक्ष्म वित्त संस्थेच्या कार्यालयांचे रूपांतर बॅंक शाखेत करण्यात येईल. देशभरात ग्राहकांना सेवा देण्यासाठी जन बॅंकेच्या २०१९ अखेरपर्यंत पाचशेहून अधिक शाखा कार्यरत असतील.

Web Title: arthavishwa news jana bank work start