‘रिलायन्स जिओ’कडून जिओफाय डोंगलची ऑफर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 सप्टेंबर 2017

नवी दिल्ली - सणासुदीच्या दिवसांत ‘रिलायन्स जिओ’ने आता ई-कॉमर्स कंपन्यांप्रमाणे ऑफर सादर केली आहे. ‘जिओ’ने फक्त रु. ९९९ मध्ये जिओफाय डोंगल देण्याची घोषणा केली आहे. याआधी डोंगल घेण्यासाठी ग्राहकांना रु. १९९९ खर्च करावे लागत होते. ग्राहकांना जिओफाय डोंगलवर एक हजार रुपयांची सवलत देऊ केली गेली आहे. 

सणासुदीच्या दिवसांसाठी ‘जिओ’कडून देण्यात आलेली ही ऑफर मात्र मर्यादित दिवसांसाठी असेल. त्यामुळे ग्राहकांना २० सप्टेंबर ते ३० 
सप्टेंबरदरम्यान जिओफाय डोंगल खरेदी करून ऑफरचा फायदा घेता येणार आहे. याआधीदेखील जिओफाय डोंगलसाठी ऑफर देण्यात आली होती. त्यामध्ये एकदा रु. १९९९ ला डोंगल खरेदी केल्यास त्यावर तेवढ्याच किमतीचा मोफत डेटा देण्यात आला होता.

आता ‘जिओ’च्या नव्या रु. ९९९ च्या ऑफरनुसार जिओफाय खरेदी करणाऱ्यांना चार रिचार्ज सायकलपर्यंत २८ दिवसांसाठी अमर्यादित कॉल, २ जीबीपर्यंत ४जी डेटा प्रतिदिवस मिळणार असून, दररोज १०० एमएमएस मोफत किंवा ६ रिचार्ज सायकलपर्यंत २८ दिवसांसाठी अमर्यादित कॉल, १ जीबीपर्यंत ४जी डेटा देण्यात येणार आहे. 

रिलायन्सच्या ‘जिओ’साठी तब्बल ६० लाख जिओ फोनची नोंदणी झाली आहे. एक कोटीहून अधिक ग्राहकांनी जिओ फोनच्या खरेदीसाठी उत्सुकता दाखविल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पहिल्याच दिवशी ६० लाख फोनचे बुकिंग झाल्याचा दावा या फोनचे वितरण करणाऱ्या रिलायन्स रिटेलने केला होता. 

शेअरमध्ये तेजी
रिलायन्स ‘जिओ’च्या वाढत्या मागणीमुळे रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये सतत वाढ सुरू आहे. आज या शेअरचा भाव रु. ८७२ पर्यंत गेला होता. कंपनीचे बाजारभांडवल रु. ५.५२ लाख कोटींवर पोचले आहे.

Web Title: arthavishwa news jiofi dongal offer by reliance jio