गुंतवणुकीत कर्नाटकची बाजी

यूएनआय
शुक्रवार, 10 नोव्हेंबर 2017

बंगळूर - वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असणाऱ्या भारतामध्ये औद्योगिक गुंतवणुकीस आकर्षित करणारे प्रमुख राज्य म्हणून कर्नाटकने बाजी मारली आहे. कर्नाटकमध्ये ४४.३ टक्के औद्योगिक गुंतवणूक करण्यात आली असून, सप्टेंबर २०१७ पर्यंत एकूण १ लाख ४७ हजार ६२५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. 

केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार कर्नाटकने जानेवारी ते सप्टेंबर या कालावधीत १ लाख ४७ हजार ६२५ कोटींची गुंतवणूक आकर्षित केली, त्यापाठोपाठ गुजरातने ६५,७४१ कोटी, तर महाराष्ट्राने २५,०१८, आंध्र प्रदेशने २४,०१३, तेलंगणने १२,५६७ कोटींची गुंतवणूक करण्यात यश मिळविले. 

कर्नाटकचे मंत्री आर. व्ही. देशपांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकने एप्रिल २००० ते जून २०१७ या कालावधीत २४.६३ अब्ज डॉलरची (१,३७,७७४ कोटी) परकी गुंतवणूक आकर्षित केली आहे. कर्नाटक अनेक वर्षांपासून परकी गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करत आहे. व्यावसायिकांसाठी कर्नाटकने ‘सकल’ योजना राबविली आहे. या योजनेअंतर्गत उद्योजकांना वेळोवेळी सेवा देण्यासोबत कोणतीही अडचण येणार नाही याची काळजी सरकारतर्फे घेण्यात येते. त्यामुळे व्यापारवृद्धीला चालना मिळून गुंतवणूकदारांना प्रोत्साहन मिळत असल्याचे देशपांडे यांनी या वेळी सांगितले. दरम्यान, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यामध्ये महाराष्ट्र पिछाडीवर जात असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्राची गुंतवणूक कर्नाटकपेक्षा तब्बल सात पटीने कमी झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या गुजरातच्या गुंतवणुकीपेक्षा महाराष्ट्राची गुंतवणूक तिपटीने कमी आहे.

सर्वाधिक गुंतवणूक 
आकर्षित करणारी राज्ये
(आकडेवारी कोटी रुपयांमध्ये) 

कर्नाटक    १ लाख ४७,६२५ 
गुजरात     ६५,७४१ 
महाराष्ट्र     २५,०१८
आंध्र प्रदेश    २४,०१३
तेलंगण     १२,५६७

Web Title: arthavishwa news karnataka top in investment