भारतातील महिलांसाठी आर्थिक गुंतवणूक करावी - चेतना सिन्हा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 24 जानेवारी 2018

दावोस - माणदेशी महिला बॅंक व माणदेशी फाउंडेशनच्या माध्यमाने भारतात ज्या पद्धतीने महिला सबलीकरणाचे कार्य सुरू आहे. ते कार्य व आमच्या गरीब महिलांची कार्यक्षमता पाहून तुम्हीही आमच्यासोबत यावे व महिलांसाठी गुंतवणूक करावी, असे आवाहन माणदेशी महिला बॅंक व माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी केले.

सिन्हा यांच्या सहअध्यक्षतेखाली आज दुपारी दावोस येथील वर्ल्ड इकोनॉमिक फोरमच्या (डब्ल्यूईएफ) महिला सदस्यांच्या झालेल्या पहिल्या बैठकीत महिलांच्या आर्थिक सबलीकरणाविषयी भूमिका त्यांनी मांडली. फोरमच्या उपाध्यक्षा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या ख्रिस्तिन लगार्ड उपस्थित होत्या. सिन्हा म्हणाल्या, ‘‘मी भारत देशातील पहिली ग्रामीण महिलांसाठी माणदेशी महिला बॅंक सुरू केली. रकमेची बचत ठेवी करण्याबरोबरच महिलांना पेन्शन देणारी ही पहिलीच बॅंक आहे. पहिली उद्योग कार्यशाळा बॅंकेच्या माध्यमाने सुरू केली. या सुविधेमुळे ग्रामीण महिला उद्योग प्रशिक्षण शाळांमध्ये जाऊ लागल्या. विशेष म्हणजे महिलाच बॅंक चालवतात, उद्योग प्रशिक्षणाच्या कार्यशाळा चालवतात, रेडिओ केंद्रही चालवतात.’’ 

भारतात या सुक्ष्म वित्तीय कंपन्या यशस्वी होण्याचे कारण महिला कर्ज काढू लागल्या आणि त्या वेळेवर कर्ज फेडू लागल्या, आता याच महिला लघुउद्योग करत आहेत, असेही  सिन्हा यांनी सांगितले. 

Web Title: arthavishwa news Make a financial investment for women in India