मोबाईल बॅंकिंगवर ‘मालवेअर’चे सावट

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

मुंबई - फ्लॅश प्लेअर मालवेअरच्या माध्यमातून मोबाईल बॅंकिंगवर सायबर हल्ला होण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे बॅंकांनी मोबाईल बॅंकिंग करणाऱ्या ग्राहकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. 

मुंबई - फ्लॅश प्लेअर मालवेअरच्या माध्यमातून मोबाईल बॅंकिंगवर सायबर हल्ला होण्याची भीती वर्तवली जात आहे. त्यामुळे बॅंकांनी मोबाईल बॅंकिंग करणाऱ्या ग्राहकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. 

बॅंकांच्या संकेतस्थळांवर किंवा ग्राहकांच्या मोबाईलवर फ्लॅश प्लेअर सुरू करण्याबाबत मेसेज किंवा पॉप-अपवर क्‍लिक केल्यास मालवेअर सक्रिय होऊन संबंधित ग्राहकाचा बॅंकविषयक डेटा चोरी होण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. याविषयी क्विकहिल सिक्‍युरिटी लॅबने बॅंकांना सावध केले असून, क्विकहिलच्या निरीक्षणानुसार हे मालवेअर म्हणजे अँड्रॉइड ट्रोजन असून, याचा २३२ बॅंकिंग ॲपना धोका पोचला आहे. हे मालवेअर बॅंकेच्या नोटिफिकेशनसारखे बनावट नोटिफिकेशन पाठवत आहे. हे ॲप्लिकेशन उघडल्यानंतर त्याची लिंक बनावट लॉगइन स्क्रिनशी जोडली जाते. त्यानंतर सायबर चोरांकडून बॅंक ग्राहकाची माहिती चोरली जाते. बॅंकांकडून दिले जाणारे वनटाइम पासवर्ड चोरण्याचीही या मालवेअरची क्षमता आहे. अनेक खासगी आणि राष्ट्रीयीकृत बॅंकांनी ग्राहकांना मेसेज आणि ई-मेल पाठवून सतर्कतेचा इशारा दिला आहे.

Web Title: arthavishwa news malware on mobile banking