‘मारुती’ निघाली सुसाट; १५५६ कोटींचा नफा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

नवी दिल्ली - मारुती सुझुकीने जूनअखेर संपलेल्या पहिल्या तिमाहीत ४.४ टक्के वाढीसह रु. १,५५६ कोटींचा नफा झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने रु. १४९१ कोटींचा नफा नोंदविला होता.

नवी दिल्ली - मारुती सुझुकीने जूनअखेर संपलेल्या पहिल्या तिमाहीत ४.४ टक्के वाढीसह रु. १,५५६ कोटींचा नफा झाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने रु. १४९१ कोटींचा नफा नोंदविला होता.

सरलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा रु. १,७०१ कोटी राहण्याचा अंदाज विश्‍लेषकांनी वर्तविला होता. सुटे भाग आणि कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने कंपनीचा उत्पादन खर्च वाढला आहे. शिवाय देशभरात वस्तू व सेवाकर लागू झाल्याने देशांतर्गत विक्रीकरात बदल झाला आहे. करात झालेल्या बदलाचा देखील कंपनीच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. या दरम्यान कंपनीच्या उत्पन्नात १७ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. ते आता रु. २०,४६० कोटींवर पोचले आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीने रु. १४,६५४.५ कोटींची विक्री नोंदविली होती. मारुती सुझुकी इंडियाने सरलेल्या तिमाहीत ३,९४,५७१ वाहनांची विक्री केली. त्यात तिमाहीत आधारावर १७ टक्‍क्‍यांची वाढ झाली आहे. यामध्ये परदेशात २६,१४० वाहनांची विक्री करण्यात आली आहे.

Web Title: arthavishwa news maruti suzuki 1556 crore profit