‘जयहिंद’चे मेवार पोशाख आता कॅम्पसाठी उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 ऑक्टोबर 2017

पुणे - गुणवत्तापूर्ण कपडे व राजेशाही समृद्धीचा वारसा पुढे चालवत ‘जयहिंद कलेक्‍शन्स’ने पुण्यातील कॅम्प येथे ‘मेवार’ शोरूम नुकतेच सुरू केले. विशेष पारंपरिक पद्धतीच्या कपड्यांचे महाराष्ट्रातील हे सर्वांत मोठे शोरूम असून, त्याचे उद्‌घाटन महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ‘जयहिंद’चे संचालक दिनेश जैन, प्रवीण जैन, विनोद जैन आदी उपस्थित होते. 

पुण्यातील लक्ष्मी रस्ता, कोथरूड, औंध, कॅम्प, पुणे-सातारा रस्ता, पिंपरी-चिंचवड आणि कोल्हापूर येथील मल्टी-ब्रॅंड रिटेल स्टोअरद्वारे लोकांच्या पसंतीस उतरलेल्या ‘जयहिंद’ने वस्त्रे व फॅशन उद्योगातील आपल्या अनुभवावरून पुरुषांसाठी सर्वोत्तम पारंपरिक पोशाख उपलब्ध करून देण्याची गरज ओळखली. त्यातूनच ‘मेवार’ हे विशेष भारतीय पारंपरिक पोशाखांचे नवे शोरूम कॅम्प येथे सुरू केले. शेरवानी, इंडो-वेस्टर्न, चुडीदार कुर्ता, डिझायनर सूट, पठाणी, फॅब्रिक रेडीमेड व फेस्टिव्ह स्पेशालिटीतील दर्जेदार क्राफ्टवर्क आणि भरतकाम केलेली सर्वोत्तम वस्त्रे या शोरूममध्ये उपलब्ध होणार आहेत.

Web Title: arthavishwa news mewar dress available in jaihind