जीएसटीबाबत गैरसमज - जेटली

पीटीआय
सोमवार, 17 जुलै 2017

लुधियाना - वस्तू व सेवाकर (जीएसटी) खूपच सहज आणि सुलभ करव्यवस्था आहे, मात्र याविषयी काही गैरसमज पसरविले जात आहेत, असे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सांगितले. जे ‘जीएसटी’चे पालन करतात त्यांना कोणताही त्रास होणार नाही. उलट सर्व ऑनलाइन सुविधा असल्याने सर्व सोपे होणार आहे, असेही ते म्हणाले.

जे लोक ‘अतिहुशारी’ करून ‘जीएसटी’सारख्या कायद्यातून पळवाटा शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र त्यांना लवकरच दुष्परिणामांना सामोरे जावे लागेल. जीएसटीला जम्मू-काश्‍मीरसारख्या राज्यानेही सहमती दिली. मात्र काही राज्यांतील लोक या करव्यवस्थेविषयी अफवा व गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करत आहेत. आमची पक्ष म्हणून कोणतीही विचारसरणी असली तरी देशाच्या एकता व एकात्मतेसाठी आमचा लढा सदैव कायम असेल, असेही जेटली या वेळी बोलताना म्हणाले.

Web Title: arthavishwa news Misconception about GST