बॅंकिंग शेअरमध्ये म्युच्युअल फंडांची विक्रमी गुंतवणूक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 28 जुलै 2017

नवी दिल्ली - म्युच्युअल फंडांची बॅंकिंग शेअरमधील गुंतवणूक विक्रमी पातळीवर पोचली आहे. फंड कंपन्यांनी जूनअखेर बॅंकांच्या शेअरमध्ये तब्बल १.४७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. शेअरमधील तेजीचा फायदा घेण्यासाठी फंड कंपन्यांकडून भांडवली बाजारात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यात येत आहे.

‘सेबी’च्या आकडेवारीनुसार जून २०१७ अखेर म्युच्युअल फंडांची बॅंकिंग शेअरमध्ये १ लाख ४६ हजार ८६१ कोटींची गुंतवणूक आहे. त्याखालोखाल वित्तीय सेवा देणाऱ्या कंपन्यांच्या शेअरमध्ये ५३ हजार १८६ कोटींची गुंतवणूक केली गेली आहे. सॉफ्टवेअर शेअरमध्ये ४३ हजार ९४९ कोटी, ग्राहकोपयोगी वस्तूंच्या शेअरमध्ये ४३ हजार ७३३ कोटी आणि ऑटो शेअरमध्ये ४२ हजार ४०५ कोटींची गुंतवणूक केली गेली आहे.

सलग सहाव्या महिन्यात फंडांनी बॅंकिंग शेअरमधील गुंतवणूक वाढविली आहे. जून २०१६ अखेर बॅंकिंग शेअरमध्ये म्युच्युअल फंडांची रु. ९३ हजार ८८५ कोटींची गुंतवणूक होती. बॅंकांना सध्या बुडीत कर्जांनी घेरले आहे. गेल्या आर्थिक वर्षातील तिमाहीत बहुतेक बॅंकांची कामगिरी बुडीत कर्जांमुळे खालावली, परिणामी बॅंकिंग शेअर स्वस्त झाले होते. त्याचा फायदा घेत फंड व्यवस्थापकांनी बॅंकिंग शेअरमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य दिल्याचे मॉर्निंग स्टार इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझरचे संचालक कौस्तुभ बेलापूरकर 
यांनी सांगितले. 

मागणी वाढण्याची शक्यता
 भांडवल बाजार नियंत्रक ‘सेबी’ने कॉर्पोरेट कंपन्यांची कर्ज पुनर्रचनेबाबतची नियमावली शिथिल करण्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर बुडीत कर्जांबाबत रिझर्व्ह बॅंकेकडून पावले उचलली जात आहेत. त्यामुळे आगामी काळात बॅंकांच्या शेअरची मागणी वाढण्याची शक्‍यता आहे.

Web Title: arthavishwa news mutual fund record investment in banking share