नवी करप्रणाली आजपासून लागू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

नवी दिल्ली - नवीन आर्थिक वर्षाला उद्या (रविवार) सुरवात होत आहे. केंद्रातील मोदी सरकारने नव्या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पात जे कर प्रस्ताव मांडले होते, ते प्रस्ताव उद्यापासून लागू होणार आहेत. त्यामुळे काही वस्तू महाग, तर काही वस्तू स्वस्त होणार आहेत.

नवी दिल्ली - नवीन आर्थिक वर्षाला उद्या (रविवार) सुरवात होत आहे. केंद्रातील मोदी सरकारने नव्या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्पात जे कर प्रस्ताव मांडले होते, ते प्रस्ताव उद्यापासून लागू होणार आहेत. त्यामुळे काही वस्तू महाग, तर काही वस्तू स्वस्त होणार आहेत.

महाग होणाऱ्या वस्तू 
मोबाईल फोन, सोने, चांदी, भाजीपाला, फळांचे रस, सन ग्लासेस, नानाविध खाद्यपदार्थ, सनस्क्रीन, हात, नखे आणि पायांची निगा राखण्यासाठी लागणारी साधने, दातांची निगा राखण्यासाठी लागणारी साधने, दंतचिकित्सेसाठीची साधने आणि पावडर, दाढी करण्यासाठी वापरण्यात येणारे क्रीम आणि तत्सम वस्तू, डिओड्रंट, परफ्यूम्स, सेंट्‌स, ट्रक आणि बसचे टायर्स, रेशमी कपडे, पादत्राणे, रंगीत खडे, हिरे, इमिटेशन ज्वेलरी, स्मार्ट घड्याळे, एलईडी आणि एलसीडी टीव्ही, फर्निचर, दिवे, व्हिडिओ गेम, तीनचाकी सायकली, स्कूटर, चाकाची खेळणी, बाहुल्या, खेळणी, खेळाचे साहित्य, सिगारेट, मेणबत्त्या, पतंग, खाद्यतेल.

या वस्तू होणार स्वस्त 
कच्चा काजू, सोलार टेम्पर्ड ग्लास, कॉक्‍लियर (कानाशी संबंधित यंत्रे) प्रत्यारोपणासाठी लागणारी कच्ची सामग्री आणि साधने, तसेच काही निवडक इलेक्‍ट्रॉनिक वस्तू.

आणखी काही परिणाम
 नोकरदार आणि उद्योजकांना आयकरावर एक टक्का उपकर आणि शेअर विक्रीच्या भांडवली नफ्यावर कर द्यावा लागणार आहे. 
 शिक्षण आणि आरोग्य अधिभारात १ टक्‍क्‍याने वाढ केली असून, त्यामुळे प्रत्येक बिल वाढणार आहे. याचाच अर्थ तुम्ही जे जे खरेदी कराल त्या त्या बिलावर १ टक्का अधिभार आकारण्यात येणार आहे. पूर्वी हा अधिभार ३ टक्के होता, तो आता ४ टक्के असणार आहे. 
 ५० हजारापर्यंतच्या व्याजावरच्या आयकरात सूट देऊन केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांना दिलासा दिला आहे. 
 ई-वे बिल प्रणाली लागू होणार असून ५० हजार रुपयांपेक्षा जास्त मूल्यांच्या आंतरराज्य मालवाहतुकीवर इलेक्‍ट्रॉनिक्‍स बिल आकारण्यात येणार.

Web Title: arthavishwa news new tax system