निफ्टी १० हजार अंशांवर

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 12 सप्टेंबर 2017

मुंबई - बॅंक, एफएमसीजी, ऑटो आणि इन्फ्रामध्ये झालेल्या खरेदीने सोमवारी (ता.११) निफ्टीने १० हजार अंशाचा टप्पा ओलांडला. दिवसअखेर निफ्टी ७१.२५ अंशांच्या वाढीसह १०,००६ अंशांवर बंद झाला. सेन्सेक्‍सही १९४.६४ अंशांच्या वाढीसह ३१, ८८२ अंशांवर बंद झाला. 

मुंबई - बॅंक, एफएमसीजी, ऑटो आणि इन्फ्रामध्ये झालेल्या खरेदीने सोमवारी (ता.११) निफ्टीने १० हजार अंशाचा टप्पा ओलांडला. दिवसअखेर निफ्टी ७१.२५ अंशांच्या वाढीसह १०,००६ अंशांवर बंद झाला. सेन्सेक्‍सही १९४.६४ अंशांच्या वाढीसह ३१, ८८२ अंशांवर बंद झाला. 

उत्तर कोरियाचा दबाव निवळल्यानंतर जगभरात खरेदीचा ओघ दिसून आला. आशिया आणि युरोपातील शेअर बाजार तेजी दिसून आली. निफ्टी मंचावर सकाळपासून खरेदीचा उत्साह दिसून आला. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सला मागणी दिसून आली. निफ्टी इन्फ्रा निर्देशांकात १.८३ टक्के, सीपीएसई १.४३ टक्के, खासगी बॅंक १.३१ टक्के वधारले. फार्मा कंपन्यांच्या शेअरमध्ये घसरण झाली. इंड्‌सइंड बॅंक, टाटा पॉवर, एलअँडटी, गेल, येस बॅंक आदी शेअरमध्ये वाढ झाली. महिंद्रा अँड महिंद्रा, इंडियाबुल्स हौसिंग फायनान्स, सन फार्मा आदी शेअरमध्ये घसरण झाली. निफ्टीने दिवसभरात १० हजार २८ अंशांपर्यंत मजल मारली होती. यापूर्वी ७ ऑगस्ट रोजी तो १०,०५७ अंशांवर बंद झाला होता. 

सेन्सेक्‍सने आज ३२ हजाराच्या दिशेने आगेकूच केली. दिवसभरात सेन्सेक्‍स ३१,९५२ अंशांपर्यंत वाढला होता. जीएसटी परिषदेने मोटारींवरील सेस वाढल्यानंतर बाजारात ऑटो शेअर्सची मागणी वाढली. मारुती, टाटा मोटर्सचा शेअर तेजीसह बंद झाला. त्याचबरोबर एचडीएफसी बॅंक, एनटीपीसी, पॉवरग्रीड, एशियन पेंट आदी शेअरमध्ये वाढ झाली. स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शुक्रवारी ४८७ कोटींचे शेअर खरेदी केले. एलअँडटीच्या शेअरमध्ये ३.८० टक्‍क्‍याची वाढ झाली आणि तो वर्षभराच्या उच्चांकावर स्थिरावला.

Web Title: arthavishwa news nifty on 10000