‘निफ्टी’ १० हजार अंशांच्या दिशेने...

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

मुंबई - शेअर बाजारात आज दिवसभर उत्साहाचे वातावरण होते. सकाळच्या सत्रात दोन्ही मुख्य निर्देशांकांनी आतापर्यंतची सर्वोच्च पातळी गाठली. अखेर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेनसेक्‍स २१७ अंशांनी वधारून ३२,२४५.८७ पातळीवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी ५१ अंशांनी वधारून ९,९६६.४ पातळीवर बंद झाला. निफ्टीने आज इंट्राडे व्यवहारात ९,९८२.०५ अंशांची, तर सेन्सेक्‍सने ३२,३२०.८६ अंशांची सर्वोच्च पातळी गाठली.

मिडकॅप आणि स्मॉलकॅप कंपन्यांच्या शेअर्समध्येदेखील खरेदीचा उत्साह होता. क्षेत्रीय पातळीवर बॅंकिंग, एफएमसीजी, आयटी आणि कंझ्युमर्स ड्युरेबल्स कंपन्यांचे शेअर्स आज सर्वाधिक वधारले होते. एफएमसीजी निर्देशांक १ टक्के, आयटी निर्देशांक १ टक्के आणि पीएसयू बॅंक निर्देशांकात १.५ टक्‍क्‍यांची वाढ नोंदवण्यात आली, तर कंझ्युमर्स ड्युरेबल्स निर्देशांकात ०.३ टक्‍क्‍याची किरकोळ वाढ झाली. याउलट आज मीडिया, मेटल आणि फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणावर विक्रीचा मारा सुरू होता.

आज मुंबई शेअर बाजारात भारती एअरटेल, विप्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, एचडीएफसी बॅंक, इंडियाबुल्स हाउसिंग आणि टीसीएस यांचे शेअर्स सर्वाधिक वधारले होते, तर डॉ रेड्डीज, वेदांत, ॲक्‍सिस बॅंक, सन फार्मा, टाटा स्टील, ओएनजीसीचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

‘जिओ’मुळे रिलायन्स तेजीत
मुंबई - रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या शुक्रवारी ‘जिओ’च्या मोफत फोनची घोषणा केल्यापासून रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये सतत वाढ सुरू आहे. 

आज कंपनीच्या शेअरने इंट्राडे व्यवहारात १६२४.८० रुपयांची उच्चांकी पातळी गाठली होती. ही शेअरची वर्षभरातील उच्चांकी पातळी आहे. मुंबई शेअर बाजारात दिवसअखेरीस ‘रिलायन्स’चा शेअर १६१६ रुपयांवर स्थिरावला. शुक्रवारच्या तुलनेत सुमारे ३० रुपयांची वाढ झाली. या शेअरने वर्षभरात ९३२ रुपयांची नीचांकी, तर १६२४.८० रुपयांची उच्चांकी पातळी गाठली आहे. 

कंपनीचे बाजार भांडवल गेल्या आठवड्यात पाच लाख कोटी रुपयांच्या खाली होते, ते आता ५.२६ लाख कोटींवर पोचले आहे. दोन दिवसांत त्यात तब्बल २६ हजार कोटींची वाढ झाली. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार कंपनीचे बाजारभांडवल रु. ५२६,२६१.१३ कोटींवर पोचले आहे.

Web Title: arthavishwa news nifty go to 10000