निफ्टीची झेप साडेदहा हजारांवर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

मुंबई - धातू, सार्वजनिक बॅंका, फार्मा आणि पायाभूत सेवा क्षेत्रातील शेअर्सच्या खरेदीने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीने आज १० हजार ५०० अंशांचा पल्ला गाठला. दिवसअखेर निफ्टी ६१.६० अंशांच्या वाढीसह १० हजार ५०४ अंशांवर बंद झाला. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्‍समध्ये १७६.२६ अंशांची वाढ झाली आणि तो ३३ हजार ९६९ अंशावर बंद झाला.

निफ्टी मंचावर टाटा स्टील, एल अँड टी, ओएनजीसी, डॉ. रेड्डीज लॅब, एशियन पेंट, सन फार्मा, बजाज फायनान्स आदी शेअर वधारले. वाहन उत्पादकांच्या शेअरमध्ये मात्र विक्री दिसून आली. यामध्ये टाटा मोटर्स, आयशर मोटर्स, बीपीसीएल, पॉवरग्रीड, एचसीएल टेक, बॉश्‍च, मारुती आदी शेअर्स घसरले. धातू निर्देशांकात २.७९ टक्‍क्‍यांची वाढ झाली. पीएसयू निर्देशांकात २.६९ टक्‍के, इन्फ्रा १.२५ टक्के, फार्मा १.२० टक्के वाढ झाली. बॅंक निफ्टीने १४४ अंशांच्या वाढीसह २५ हजार ४६२ अंशापर्यंत मजल मारली. ज्यात पीएनबी, बॅंक ऑफ बडोदा, एसबीआय आदी शेअर्स सर्वाधिक वधारले.

मुंबई शेअर बाजारात सकाळपासून खरेदी दिसून आली. धातू निर्देशांकात ४०८ अंशांची वाढ झाली. हिंदुस्थानी फूड स्टॉक या शेअरला अपर सर्किट लागले. दिवसअखेर तो १० टक्‍क्‍यांच्या वाढीसह ३७६.२० रुपयांवर बंद झाला.

Web Title: arthavishwa news nifty go to 10500