आयओसी दुपटीने वाढविणार तेल शुद्धीकरण क्षमता 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

नवी दिल्ली - इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (आयओसी) तेल शुद्धीकरण क्षमता दुपटीने वाढविण्यासाठी १.४३ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यामुळे कंपनीची तेल शुद्धीकरण क्षमता २०३० पर्यंत १५ कोटी टनांपर्यंत जाणार आहे. इंधनाची वाढती मागणी लक्षात घेऊन तेल शुद्धीकरण क्षमता वाढविण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. इंधन मागणी २०४० पर्यंत दुपटीने वाढणार आहे. कंपनी पेट्रोकेमिकल्स आणि पर्यायी इंधन क्षेत्रात विस्तार करीत आहे. सध्या देशातील २३ तेल शुद्धीकरण प्रकल्पांपैकी ११ इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे आहेत. कंपनीच्या या शुद्धीकरण प्रकल्पांची सध्याची क्षमता दरवर्षी ८.०७ कोटी टन आहे.

Web Title: arthavishwa news Oil refining capacity increase by IOC