तेलाच्या किमतीमध्ये घसरण 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 एप्रिल 2018

मुंबई - घाऊक व्यापाऱ्यांकडून घटत असलेल्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर शुद्ध पामोलीन तेलाच्या किमती घसरल्या होत्या; तसेच साबण व जहाज व्यावसायिकांकडून एरंडेल तेलाच्या मागणीत घट झाल्याने या तेलाच्या किमतीही तुलनेने अधिक घसरल्याचे वाशी बाजारातील चित्र होते. रंगकाम उद्योगांकडून घटलेली मागणी जवस तेलाच्या पथ्यावर पडत किमतीत घसरण झाली. दरम्यान, इतर तेलांच्या तुलनेत खोबरेल तेलांचे भाव मात्र स्थिर राहिल्याचे चित्र बाजारात होते. मोठ्या प्रमाणात खरेदीचे चित्र दिसत नसले तरी मागणीचा अभावही नव्हता, त्यामुळे खोबरेल तेलाचे भाव स्थिर होते, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

मुंबई - घाऊक व्यापाऱ्यांकडून घटत असलेल्या मागणीच्या पार्श्‍वभूमीवर शुद्ध पामोलीन तेलाच्या किमती घसरल्या होत्या; तसेच साबण व जहाज व्यावसायिकांकडून एरंडेल तेलाच्या मागणीत घट झाल्याने या तेलाच्या किमतीही तुलनेने अधिक घसरल्याचे वाशी बाजारातील चित्र होते. रंगकाम उद्योगांकडून घटलेली मागणी जवस तेलाच्या पथ्यावर पडत किमतीत घसरण झाली. दरम्यान, इतर तेलांच्या तुलनेत खोबरेल तेलांचे भाव मात्र स्थिर राहिल्याचे चित्र बाजारात होते. मोठ्या प्रमाणात खरेदीचे चित्र दिसत नसले तरी मागणीचा अभावही नव्हता, त्यामुळे खोबरेल तेलाचे भाव स्थिर होते, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. खाद्यतेलांमध्ये शुद्ध पामोलीन तेलाची किंमत दहा किलोग्रॅमला एक रुपयांनी घटून ७३१ रुपये झाली. खोबरेल तेलाचे भाव मात्र १० किलोग्रॅमला ८५० रुपयांवर स्थिर होते. अखाद्यतेलांमध्ये एरंडेल तेलाचे भाव १०० किलोग्रॅममागे ३५ रुपयांनी घटून ४,११५ रुपये झाले होते. जवसाचे तेल प्रति १० किलोग्रॅम ७ रुपयांनी घसरून ८५३ रुपये झाले होते.

Web Title: arthavishwa news palmolein oil rate decrease