पेटीएम पेमेंट्‌स बॅंकेच्या एटीएम सुविधेला सुरवात

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

मुंबई - भारताची सर्वांत मोठी डिजिटल बॅंक पेटीएम पेमेंट्‌स बॅंकेने ‘पेटीएम का एटीएम’ केंद्रे सुरू केली आहेत. ज्यात ग्राहकांना बचत खाते उघडण्याची व त्यांच्या बॅंक खात्यातून पैसे काढण्याची किंवा खात्यात पैसे ठेवण्याची सुविधा मिळते. पेटीएम पेमेंट्‌स बॅंक ही एकमेव बॅंक आहे जी शून्य शिल्लक खात्याची आणि डिजिटल व्यवहारांवर शुल्क न घेण्याची सुविधा देते. ही विशेष केंद्रे ग्राहकांना बॅंकिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावतील.

पहिल्या टप्प्यात, पेटीएमने दिल्ली एनसीआर, लखनौ, कानपूर, अलाहाबाद, वाराणसी आणि अलीगडसारख्या काही निवडक शहरांत ३ हजार एटीएम केंद्रे सुरू केली आहेत. दक्षिण आणि पूर्व भागांसह देशभरात आणखी १ लाख केंद्रे सुरू करून पूर्ण देशात या सेवेचा विस्तार करण्याचा कंपनीचा मानस आहे. कंपनीने पेटीएम ॲपवर खास बॅंकिंग विभागदेखील दाखल केला आहे. ज्यात पेमेंट, डिजिटल डेबिट कार्ड, पासबुक, मदत व इतर बॅंकिंग सेवा उपलब्ध आहेत.

Web Title: arthavishwa news paytm payment bank atm facility