आणखी तेराशे कोटींची भर

पीटीआय
बुधवार, 28 फेब्रुवारी 2018

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) गैरव्यवहाराचा आकडा सुमारे तेराशे कोटी रुपयांनी आणखी वाढण्याचा अंदाज असून, हा गैरव्यवहार १२ हजार ७०० कोटी रुपयांवर जाईल, असे ‘पीएनबी’ने म्हटले आहे. 

नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बॅंकेतील (पीएनबी) गैरव्यवहाराचा आकडा सुमारे तेराशे कोटी रुपयांनी आणखी वाढण्याचा अंदाज असून, हा गैरव्यवहार १२ हजार ७०० कोटी रुपयांवर जाईल, असे ‘पीएनबी’ने म्हटले आहे. 

देशातील सार्वजनिक क्षेत्रातील ‘पीएनबी’ ही दुसऱ्या क्रमांकाची बॅंक आहे. ‘पीएनबी’तील गैरव्यवहार आधी ११ हजार ४०० कोटी रुपयांचा होता. अब्जाधीश हिरे व्यापारी नीरव मोदी आणि त्याचा मामा मेहुल चोक्‍सी यांनी ‘पीएनबी’कडून ‘लेटर ऑफ अंडरटेकिंग’ घेऊन बॅंकेला गंडा घातला होता. हा गैरव्यवहार १४ फेब्रुवारीला उघड झाला होता. बॅंकेने केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) तक्रार दाखल केल्यानंतर हे समोर आले होते. या गैरव्यवहाराचा आकडा तेराशे कोटी रुपयांनी वाढण्याचा अंदाज काल (ता. २६) बॅंकेने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत व्यक्त केला. आता हा एकूण गैरव्यवहार १२ हजार ७०० कोटींवर पोचल्याचा अंदाज आहे.

Web Title: arthavishwa news pnb Non behavioral crime