सेन्सेक्‍सवरील दबाव कायम 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 4 जानेवारी 2018

मुंबई - तिमाही निकालांच्या प्रतीक्षेत असलेल्या गुंतवणूकदारांनी सलग तिसऱ्या सत्रात ऑटो, आयटी, हेल्थकेअरसारख्या क्षेत्रातील शेअर्सची विक्री करून नफावसुली केली. त्यामुळे दिवसअखेर सेन्सेक्‍स १८.८८ अंशांच्या घसरणीसह ३३ हजार ७९३.३८ अंशांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीत १ अंशाची किरकोळ घट झाली आणि १० हजार ४४३.२० अंशांवर बंद झाला. 

धातू कंपन्यांचे शेअर्स तेजीत होते. गेल्या काही सत्रांत वधारलेल्या वाहन उत्पादकांच्या शेअर्समध्ये नफावसुली दिसून आली. कॉर्पोरेट कंपन्यांच्या तिमाही निकालांवरून बाजाराची पुढील दिशा स्पष्ट होणार असल्याचे जिओजित फायनान्शिअल सर्व्हिसेसचे मुख्य विश्‍लेषक विनोद नायर यांनी सांगितले. डॉ. रेड्डीज लॅबच्या शेअरमध्ये सर्वाधिक घसरण नोंदवण्यात आली.

त्याखालोखाल व्रिपो, ओएनजीसी, बजाज ऑटो, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, एचडीएफसी बॅंक, इन्फोसिस, एनटीपीसी, सन फार्मा, इंड्‌सइंड बॅंक, कोटक बॅंक आदी शेअर घसरले. याआधीच्या दोन सत्रांत सेन्सेक्‍सने २४४ अंश गमावले होते. अदानी पोर्ट, आयसीआयसीआय बॅंक, एलअँडटी, येस बॅंक, कोल इंडिया, पंजाब अँड सिंध बॅंक आदी शेअरमध्ये वाढ झाली.

Web Title: arthavishwa news pressure continue on sensex