अर्थव्यवस्था भक्कम, तर मोदी अद्वितीय - बजाज

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 जानेवारी 2018

दावोस (स्वित्झर्लंड) - ‘‘आमची अर्थव्यवस्था भक्कम आहे. आम्हाला काही अडचणी जरूर आहेत; पण पंतप्रधान नरेंद्र मोदी अद्वितीय आहेत,’’ असे मत प्रसिद्ध उद्योगपती राहुल बजाज यांनी येथे सोमवारी व्यक्त केले. 

दावोस येथे ‘जागतिक आर्थिक मंचा’च्या ४८व्या वार्षिक परिषदेसाठी ते येथे आले आहेत. या प्रसंगी बोलताना त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेविषयी गौरवोद्‌गार काढले. ते म्हणाले, ‘‘देशाची तुलना एखाद्या व्यक्तीशी मला करायची नाही. आम्हाला अडचणी आहेत; पण आपली मोठी लोकसंख्या ही ३५ वर्षे वयोगटाखालील आहे. आम्ही त्यांना शिक्षण आणि कौशल्य विकास करण्याची संधी दिली तर देशाला त्याचा मोठा लाभ होईल.’’ 

तत्कालीन पंतप्रधान देवेगौडा यांनी दावोस परिषदेला गांभीर्याने घेतले नव्हते, अशी टीकाही बजाज यांनी या वेळी केली. माजी पंतप्रधान देवेगौडा हे २१ वर्षांपूर्वी दोवोसला आले होते; पण दुर्दैवाने ते त्यांच्या कुटुंबासह येथे आले होते. यामुळेच कदाचित त्या वेळी योग्य गोष्टी झाल्या नाहीत, अशी टीका त्यांनी केली. ही परिषद म्हणजे काही सहल नसते तर गंभीरपणे घ्यायची बाब आहे, असे ते म्हणाले. झाले गेले, आता मोदी येथे येत आहेत, याचा आनंद असल्याचेही बजाज यांनी सांगितले. 

पंतप्रधान मोदी यांचे सोमवारी दावोस येथे आगमन झाले.  ते मंगळवारी परिषदेत भाषण करणार आहेत.

Web Title: arthavishwa news rahul bajaj talking