राजीव बन्सल एअर इंडियाचे ‘सीएमडी’

पीटीआय
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

नवी दिल्ली - वरिष्ठ सनदी अधिकारी राजीव बन्सल यांची एअर इंडियाचे प्रमुख तथा व्यवस्थापकीय संचालकपदी (सीएमडी) तीन महिन्यांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. अश्‍वनी लोहानी यांची रेल्वे मंडळाचे प्रमुखपदी निवड झाल्यानंतर रिक्त झालेल्या एअर इंडियाच्या ‘सीएमडी’पदी बन्सल यांची वर्णी लागली आहे. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने बन्सल यांच्या नियुक्तीची घोषणा केली. बन्सल हे १९८८ च्या बॅचचे नागालॅंड केडरचे अधिकारी असून ते मूळचे हरियानाचे आहेत.

Web Title: arthavishwa news rajiv bansal air india cmd