रिलायन्स ‘जिओ’चा यंदाही दिवाळी धमाका 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 11 ऑक्टोबर 2017

नवी दिल्ली - रिलायन्स ‘जिओ’ने पुन्हा एकदा दिवाळी धमाका केला आहे. आपल्या ग्राहकांसाठी आकर्षक व्हॉईस आणि डेटा प्लॅन सादर केला आहे. दिवाळीचे दिवस लक्षात घेऊन जिओफाय डिव्हाइसवर ३१ ऑक्‍टोबरपर्यंत ऑफर देऊ केल्यानंतर, ‘जिओ’पासूनच्या टेरिफ प्लॅनमध्ये काही बदल केले आहेत. १४९ रुपयांच्या ऑफरमध्ये कंपनीने सर्वांत मोठा बदल केला आहे.

नव्या योजनेअंतर्गत १४९ रुपयांमध्ये २८ दिवसांसाठी २ जीबी ४जी इंटरनेट, अमर्यादित व्हॉइस कॉलिंग, ३०० एसएमएस आणि जिओ ॲप्स मेंबरशिपही मिळणार आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सुरवातीचा २जीबी डेटा संपल्यानंतरदेखील इंटरनेट सेवा वापरता येणार आहे. मात्र, इंटरनेट स्पीड ४जीपासून कमी होऊन ६४ केबीपीएसपर्यंत कमी होणार आहे. आधीच्या १४९ रुपयांच्या डेटा प्लॅनमध्ये डेटा संपल्यानंतर कोणताही डेटा मिळत नव्हता. दिवसभर ‘अनलिमिटेड कॉलिंग’चा गैरफायदा घेणाऱ्यांना फटका बसणार आहे, कारण त्यांच्यासाठी ३०० मिनिटांची मर्यादा ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. प्रत्येक दिवसासाठी ३०० मिनिटांची मर्यादा असणार आहे. सध्या अनेक लोक ‘जिओ’चे कार्ड वापरून दिवसाला १० तासांपेक्षा जास्त बोलत आहेत. यामध्ये मार्केटिंग आणि प्रमोशनल कॉलचाही वापर होत असल्याने हा गैरवापर रोखण्यासाठी अशा ग्राहकांना ‘जिओ’ ३०० मिनिटे मोफत देणार आहे. अमर्यादित कॉलिंगची सुविधा फक्त वैयक्तिक ग्राहकांनाच देणार आहे.

Web Title: arthavishwa news reliance jio diwali dhamaka