‘कोलते-पाटील डेव्हलपर्स’कडे ‘रेरा’ नोंदणीकृत भागीदार सज्ज

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 25 ऑगस्ट 2017

पुणे - कोलते-पाटील डेव्हलपर्स लि.ने अलीकडेच ‘रेरा’ नोंदणी मोहिमेचे आयोजन केले होते. या अंतर्गत आपल्या व्यवसाय भागीदारांना आवश्‍यक माहिती मिळवून देण्याइतपत सक्षम बनविणे आणि नियामक प्रक्रियेच्या पूर्ततेत त्यांची मदत करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट होते. या नोंदणी मोहिमेत केवळ एका दिवसांत २०० संभाव्य भागीदारांनी सहभाग घेतल्याचे दिसून आले. त्यांनी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली असून, त्यांचा वितरित नोंदणी क्रमांक कंपनीच्या संकेतस्थळावर नमूद केला गेला आहे.

पुणे - कोलते-पाटील डेव्हलपर्स लि.ने अलीकडेच ‘रेरा’ नोंदणी मोहिमेचे आयोजन केले होते. या अंतर्गत आपल्या व्यवसाय भागीदारांना आवश्‍यक माहिती मिळवून देण्याइतपत सक्षम बनविणे आणि नियामक प्रक्रियेच्या पूर्ततेत त्यांची मदत करण्याचे कंपनीचे उद्दिष्ट होते. या नोंदणी मोहिमेत केवळ एका दिवसांत २०० संभाव्य भागीदारांनी सहभाग घेतल्याचे दिसून आले. त्यांनी नोंदणीची प्रक्रिया पूर्ण केली असून, त्यांचा वितरित नोंदणी क्रमांक कंपनीच्या संकेतस्थळावर नमूद केला गेला आहे. ही सर्व मंडळी कोलते-पाटील डेव्हलपर्सच्या बरोबरीने व्यवसाय करण्यास आता सज्ज झाली आहेत, अशी माहिती कोलते-पाटील डेव्हलपर्सचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी गोपाल सारडा यांनी दिली आहे.

श्री. सारडा म्हणाले, की आम्ही ‘रेरा’चे त्यांच्या सर्व नियम व अटींसह स्वागत केले आहे आणि यातून पारदर्शकता, उत्तरदायित्व आणले जाईल व ग्राहकांचा आत्मविश्वास वाढेल. आमचे व्यवसाय भागीदार हे ग्राहक आणि मालमत्ता विकसक यांच्यातील एक महत्त्वाचा दुवा आहेत. म्हणूनच आम्ही त्यांच्यासाठी ही ‘रेरा’ नोंदणी मोहीम आयोजित केली होती. यात संभाव्य भागीदारांनी नोंदणी करून दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद उत्साहवर्धक आहे.

स्थावर मालमत्ता नियमन कायदा (रेरा) अंतर्गत ‘कोलते-पाटील’ने आपल्या सर्व प्रकल्पांची यशस्वीरीत्या नोंदणी निर्धारीत ३१जुलै या मुदतीपूर्वीच पूर्ण केली आहे. कायद्यानुसार, एजंटांनाही ‘रेरा’ नोंदणी अनिवार्य आहे आणि स्थावर मालमत्ता कंपनीच्या प्रकल्पांच्या विक्री व विपणनासाठी त्यांचे संबंधित कंपनीकडे नोंदणीकृत असणे आवश्‍यक आहे. स्थावर मालमत्ता कंपन्यांना ‘रेरा’कडे ३१ जुलैपूर्वी नोंदणी करावी लागली असली, तरी मालमत्ता एजंट आणि दलाल यांच्यावर अशा कोणत्याही मुदतीपर्यंत नोंदणीचे बंधन नाही.

Web Title: arthavishwa news rera registration kolate-patil developers